वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : भारत आणि चीन यांच्यात सीमेवर गेल्या वर्षभरापासून तणावाचे वातावरण आहे.यातच चीनकडून सातत्याने भारतीय सीमेत घुसखोरीचे प्रयत्न सुरू आहेत. आता भारत आणि चीन सीमेबाबत अमेरिकेच्या संरक्षण विभागाने तयार केलेल्या वार्षिक अहवालात धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. त्यानुसार अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागात चीनने 100 घरांचे गाव वसवले असल्याची माहिती समोर आली आहे. A village built by China on the border of Arunachal; Dragon’s evil revealed in US report
अमेरिकन काँग’ेससमोर हा अहवाल सादर करण्यात आला आहे. अरुणाचलमध्ये सीमेला लागून भारताच्या हद्दीत चीनने गाव वसवले असल्याचे वृत्त जानेवारीमध्ये आले होते. त्यावेळी हाय रिझोल्यूशन सॅटेलाईट इमेजेसच्या आधारे हा दावा करण्यात आला होता. चीनने अरुणाचलमध्ये मॅकमोहन लाईनच्या दक्षिणेला भारतीय हद्दीत हे गाव वसवले आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या अहवालात म्हटले आहे की, भारत आणि चीन यांच्यात सीमेवर तणाव सुरू आहे. त्यासंदर्भात अहवालात असे म्हटले आहे की, 2020 मध्ये चीनने भारत-चीन वादग’स्त भागात 100 घरे उभारली आहे. ही घरे तिबेटचे स्वायत्त क्षेत्र आणि भारताचे अरुणाचल प्रदेशातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ आहे. चीनकडून अशा पद्धतीने बांधकामामुळे भारताच्या चिंतेत भर टाकली आहे.
अरुणाचलमध्ये वरच्या भागात असलेल्या सुबनसिरी जिल्ह्यात आणि त्सारी चृ नदीच्या काठी चीनने ही घरे बांधली आहेत. हा भाग असा आहे, जिथे 1962 च्या युद्धाच्या आधीही भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये अनेकदा झटापट झाली आहे. चीनने गेल्या दहा वर्षांहून अधिक काळापासून या भागात एक लहान लष्करी चौकी उभारली होती. 2020 मध्ये मात्र चीनने अचानक या भागात एक पूर्ण गावच वसवले. याशिवाय चीनने रस्तेही तयार केले आहेत.
सीमेवर तणाव कमी व्हावा, यासाठी भारत आणि चीन यांच्यात लष्करी पातळीवर चर्चा सुरू आहेत. आतापर्यंत चर्चेच्या अनेक फेर्या होऊनही यात कोणताही तोडगा निघाला नाही. दरम्यान, दोन्ही देशांनी सीमेवर शांतता अबाधित राखण्यास आवश्यक ती पावले उचलू, असे म्हटले असले तरी सीमेवर तणावाचे प्रसंग निर्माण होत असल्याचे अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या अहवालात म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App