शिकारीपासून वाचवलेल्या वाघिणीने तीन पिल्लांना जन्म दिला, मात्र नंतर मेलेल्या दोघांना खाल्ले!

पोटात सापळा अडकलेला असूनही कॉर्बेट टायगर रिझर्व्ह सेंटरमध्ये दिला होता पिल्लांना जन्म

विशेष प्रतिनिधी

देहरादून :  पोटात सापळा अडकलेला असूनही कॉर्बेट टायगर रिझर्व्ह सेंटरच्या रेस्क्यू सेंटरमध्ये चार दिवसांपूर्वी तीन पिल्लांना जन्म देणाऱ्या वाघिणीने तिची दोन पिल्ले मरण पावल्यानंतर खाऊन टाकल्याची घटना समोर आली आहे. आता तिच्याकडे एकच पिल्लू उरले आहे आणि ते पूर्णपणे निरोगी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर वाघिणीवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. A tigress rescued from poachers gave birth to three cubs but later ate the dead two

या वाघिणीला सध्या ढेला रेस्क्यू सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.  नुकताच तिने तीन पिल्लांना जन्म दिला होता, मात्र बुधवारी त्यापैकी एका पिल्लाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या पिल्लाचाही गुरुवारी मध्यरात्री मृत्यू झाला होता. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव कर्मचार्‍यांनी पिल्लांचे मृतदेह वाघिणीच्या पिंजऱ्यातून बाहेर काढले नव्हते. मात्र शुक्रवारी सकाळी दोन्ही पिल्लांचे मृतदेह वाघिणीच्या पिंजऱ्यात आढळले नाहीत.

कॉर्बेट प्रशासनाने सांगितले की, वाघिणीनेच पिल्लांचे मृतदेह खाल्ले आहेत. सहसा वाघ आणि चित्ता  हे प्राणी अशाप्रकारे वागतात. आता वाघिणीवर नजर ठेवण्यासाठी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी दुष्यंत शर्माही त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.

वन्यजीव तज्ञ या घटनेला असामान्य मानत नाहीत. त्यांचे म्हणणे आहे की जर वाघिणीला तिचे शावक कमकुवत वाटले तर ती त्यांना मारते. चित्ता तसेच वाघिणीची ही प्रवृत्ती आहे. जंगलातही जगू न शकणाऱ्या आपल्या कमकुवत पिल्लांना ते मारतात.

A tigress rescued from poachers gave birth to three cubs but later ate the dead two

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात