मॉस्कोच्या शासकीय ग्रंथालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा!!; फडणवीस, नार्वेकर अनावरणासाठी जाणार

प्रतिनिधी

नागपूर : प्रख्यात लोकसाहित्यिक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा रशियाची राजधानी मॉस्को येथील शासकीय ग्रंथालयात उभारला आहे. त्याचा अनावरण समारंभ लवकरच होणार असून या समारंभासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जाणार आहेत. स्वतः फडणवीस यांनीच ही माहिती दिली आहे A statue of the democrat Annabhau Sathe in the Government Library of Moscow

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे कामगार चळवळीचे अध्वर्यू होते. कम्युनिस्ट रशियामध्ये त्यांनी काही काळ वास्तव्य केले होते. तेथेच त्यांची शाहिरी लेखणी तळपली होती. अण्णाभाऊंनी माझा रशियाचा प्रवास हे पुस्तक देखील लिहिले आहे. तिथल्या कामगार क्रांतीने अण्णाभाऊ भारावले होते. त्या क्रांतीतून प्रेरणा घेऊन अण्णाभाऊंनी मुंबई आणि महाराष्ट्रात खूप मोठे कार्य केले.

मुंबई विद्यापीठ आणि रशिया सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा मॉस्कोच्या शासकीय वाचनालयात लावला जाणार आहे. ही अतिशय गौरवाची आणि प्रेरणादायी बाब आहे. अण्णाभाऊंचे रशियात अनेक महिने वास्तव्य होते. त्यांच्या पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमासाठी आम्हाला निमंत्रण आहे. त्यामुळे मी आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्या अनावरण समारंभासाठी रशियाला जाणार आहोत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

A statue of the democrat Annabhau Sathe in the Government Library of Moscow

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात