विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: काही पुरूष अजूनही पुरुष असल्याचा खोटा अहंकार बाळगणारे आणि स्त्रियाना त्रासदायक होईल असे वागतात. आपण हे नाकारू शकत नाही कारण आपल्याला हे दिसते आहेे. पुरुषांना याचे काही वाईट वाटत नाही आणि ते आपले वागणे बदलत पण नाहीत.
A shameful video of men harassing a woman by throwing crackers at her getting viral
आता हे उदाहरण पहा. या व्हिडिओमध्ये बाईक वरून जाणारा हा महाभाग बायकांच्या अंगावर फटाके फेकतांना दिसतोय तर दुसऱ्याने हा व्हिडीओ ट्विटरवर लाफींग इमोजी टाकून पोस्ट केलाय. यात मानसिक हिनतेचे प्रदर्शन होते आहे, हे पण न कळणारी ही माणसं आहेत.
शेवटी नासाने शेअर केला दिवाळीच्या शुभेच्छा देणारा अंतराळातील खुराखुरा फोटो
आम्हाला असे म्हणायचे आहे की बायकांना त्रास होईल असं वागणं यात काय मजेदार किंवा हसण्यासारखे आहे? आपल्यासारखा विचार करणारे अनेकजण आहेत. आपल्या वागण्यातून आपली मानसिकता दिसते. त्यामुळे महिलांना समाजात सुरक्षित वाटणे दूरच पण दडपणाखाली वावरावे लागते आणि पुरुषांना यात आपला कमीपणा वाटला पाहिजे. ट्विटरवर आलेले ट्विटसपण या घटनेचा निषेध करत आहेत. आता या व्हीडीओवरील हसणारी इमोजी टाकून केलेली ट्विट काढली गेली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App