प्रशासकीय तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी बोलावली तातडीची बैठक
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चक्रीवादळ बिपरजॉयने भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आपले भयंकर रूप दाखवण्यास सुरुवात केली आहे. मुंबई ते केरळ किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत आहेत. समुद्राच्या मध्यातून उंच लाटा उसळत आहेत आणि किनाऱ्यावर आदळत आहेत. वादळाची परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१२ जून) दुपारी एक वाजता बैठक बोलावली असून, त्यात ते तयारीचा आढावा घेणार आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. A review meeting called by Prime Minister Modi in the wake of Cyclone Biparjoy
बिपरजॉयचे रविवारी तीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले होते. ते भारताच्या किनारपट्टीकडे वेगाने पुढे जात आहे. 15 जूनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी त्याचा परिणाम आतापासूनच दिसायला लागला आहे. मुंबईत वादळी वाऱ्यांमुळे विमानसेवा विस्कळीत झाली आहे.
गुजरातमध्ये ऑरेंज अलर्ट –
भारतीय हवामान खात्याने गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्र प्रदेशात ऑरेंज अलर्ट जाहीर केला असून, यापूर्वी येथे यलो अलर्ट जाहीर करण्यात आला होता. बिपरजॉय 15 जूनच्या दुपारपर्यंत मांडवी (गुजरात) आणि कराची (पाकिस्तान) दरम्यान जाण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळाच्या इशाऱ्यांदरम्यान, गुजरातच्या कच्छमधील सखल किनारपट्टीच्या भागातून लोकांना तात्पुरत्या आश्रयस्थानांमध्ये हलवण्यात येत आहे. वृत्तसंस्था एएनआयने दीनदयाळ बंदर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याचा हवाला देत सांगितले की, रविवारी (11 जून) सहा जहाजे बंदरातून निघाली आणि आणखी 11 जहाजे सोमवारी निघतील. बंदर अधिकारी आणि जहाज मालकांनाही सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
मुंबईत उड्डाणे थांबवली –
खराब हवामानामुळे मुंबई विमानतळावरील विमानसेवांमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. रविवारी रात्री उशिरा अनेक विमानांना उशीर झाला, तर अनेकांना रद्द करावे लागले. एअर इंडियाने ट्विट केले की, खराब हवामानामुळे आणि मुंबई विमानतळावरील धावपट्टी 09/27 तात्पुरती बंद झाल्यामुळे आमची काही उड्डाणे उशीरा आणि रद्द झाली आहेत. आमच्या पाहुण्यांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App