
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्तर प्रदेश दौऱ्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या सर्व चर्चेत एका खास भेटीनं सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. A promise made is a promise kept :PM Narendra Modi Meets Indian Olympic Athlete Priyanka Goswami Meerut
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी परत एकदा आपले वचन पाळले आहे. त्यांनी मेरठ दौऱ्यात ऑलिम्पियन खेळाडूला दिलेला शब्द पाळल्याचे पाहायला मिळाले. मोदींनी काही दिवसांपूर्वी भारतीय महिला खेळाडूला भेटण्याचे वचन दिले होते. ती खेळाडूही मोदींच्या भेटीसाठी खूपच उत्सुक होती.अखेर तिची उत्सुकता रविवारी संपली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिच्यासह कुटुंबियांची भेट घेतली. नव्या वर्षात मोदींनी भारतीय खेळाडूला दिलेलं हे मोठं गिफ्टचं आहे.
PM Shri @narendramodi fulfills promise made to Meerut’s Olympian Priyanka Goswami during his visit today. pic.twitter.com/0peFEPoHJ8
— BJP Delhi (@BJP4Delhi) January 2, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील स्पोर्ट्स यूनिवर्सिटी भूमिपूजन कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थितीत होते. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमात स्थानिक खेळाडूंशी संवादही साधला. यावेळी त्यांनी ऑलिम्पियन खेळाडूला दिलेल्या वचनाची पूर्तीही केली.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) वॉकिंग क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या प्रियांका गोस्वामी (Priyanka Goswami) या खेळाडूची मोदींनी भेट घेतली. तिने ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकले नसले तरी लक्षवेधी कामगिरी करुन दाखवली होती. टोकियोमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतून खेळाडू मायदेशी परतल्यानंतर ज्यावेळी पंतप्रधानांनी ऑलिम्पियन खेळाडूंशी संवाद साधला होता त्यावेळी त्यांनी प्रियांकाला एक वचन दिले होते. मेरठमध्ये आल्यावर नक्की भेट घेईन, असे मोदी त्यावेळी म्हणाले होते.
स्पोर्ट्स यूनिवर्सिटीच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला आल्यानंतर त्यांनी आपला शब्द पाळला. प्रियांकानेही मोदींच्या या भेटीनंतर आनंद व्यक्त केला आहे. ती म्हणाली की, तुम्ही भेटण्याचा शब्द दिला होता. तेव्हा पासून भेटीसाठी उत्सुक होते. मी मनापासून आपले आभार मानते. आता मी आणखी उत्साहाने सरावास सज्ज होईल. या भेटीमध्ये प्रियांगा गोस्वामीनं मोदीजींना रामायणाची प्रत भेट म्हणून दिली. कुटुंबियांसह झालेली भेटीसाठी खूप उत्साहित होते. नव्या वर्षातील ही भेट अविस्मरणीय आहे, अशा भावना प्रियांकाने व्यक्त केल्या आहेत. यावेळी मोदींनी प्रियांका गोस्वामीसह अन्य काही स्थानिक खेळाडूंचीही भेट घेतली. यात हॉकी खेळाडू ललित उपाध्याय, अन्नू राणी, बॉक्सर सतीश कुमार या खेळाडूंचाही समावेश होता.
A promise made is a promise kept :PM Narendra Modi Meets Indian Olympic Athlete Priyanka Goswami Meerut
महत्त्वाच्या बातम्या
- ओमायक्रॉनला कोरोनावरील नैसर्गिक लस म्हणणे धोकादायक, बेजबाबदारपणे याची चर्चा करणे चुकीचे असल्याचे तज्ज्ञांचे मत
- जगाच्या शिखरावर उभारला पूल, तब्बल १९ हजार फुटावरून जाणारा सर्वात उंचीवरील रस्ता झाला सुरू
- विवाहाचे वय १८ वरून २१ करण्याच्या समितीत केवळ एकच महिला सदस्या
- उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथच, २३० ते २४९ जागांवर विजय मिळविण्याचा सर्वेक्षणात अंदाज