Manipur : मणिपूरमध्ये दोन महिन्यांत लोकप्रिय सरकार स्थापन होईल, भाजप खासदाराचा दावा!

Manipur

१३ फेब्रुवारीपासून उत्तर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू आहे.


विशेष प्रतिनिधी

इंफाळ : Manipur  मणिपूरमधील भाजपचे एकमेव राज्यसभा सदस्य महाराजा सनाजाओबा लेशेम्बा यांनी रविवारी आशा व्यक्त केली की पुढील दोन महिन्यांत राज्यात एक लोकप्रिय सरकार स्थापन होईल. तसेच, राज्यसभा सदस्याने सर्व राजकीय नेत्यांना राज्यासमोरील आव्हानांना तोंड देण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.Manipur

“मला आशा आहे की पुढील दोन महिन्यांत मणिपूरमध्ये एक लोकप्रिय सरकार स्थापन होईल,” असे ५३ वर्षीय खासदार लेशेम्बा यांनी माध्यमांना सांगितले. केवळ राष्ट्रपती राजवटीने सध्याचे प्रश्न सुटू शकत नाहीत. एक लोकप्रिय सरकार लोकांसोबत एकत्र काम करू शकते आणि सध्याच्या वांशिक संकटावर तोडगा काढू शकते. वांशिक संकटाचा सामना करण्यासाठी राज्याचे निवडून आलेले आमदार आणि नेते एकत्रितपणे आणि निर्णायकपणे काम करण्यात अपयशी ठरले आहेत या सार्वजनिक टीकेशी ते सहमत होतो. असं ते म्हणाले.



याचबरोबर कोणत्याही नेत्याचे किंवा आमदाराचे नाव न घेता, खासदार लेशेम्बा म्हणाले की, काही लोकांनी राज्याच्या कल्याण आणि हितांपेक्षा वैयक्तिक ध्येयांना प्राधान्य दिले आहे. काही लोकांनी राज्याच्या कल्याणापेक्षा सत्ता आणि स्वार्थाला प्राधान्य दिल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागली.

बिरेन सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर चार दिवसांनी, १३ फेब्रुवारीपासून उत्तर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मणिपूर विधानसभा निलंबित करण्यात आली आहे, जरी तिचा कार्यकाळ २०२७ पर्यंत आहे.

A popular government will be formed in Manipur within two months claims BJP MP

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात