विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानातल्या दहशतवादाविरोधात ऑपरेशन सिंदूर सुरू करताच पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि मिसाईलने हल्ले केले. पण अशा प्रत्यक्ष हल्ल्यांपेक्षा पाकिस्तानने वेगवेगळ्या सोशल मीडियातून भारतावर फेक न्यूजचे हल्ले जास्त केले. पण या फेक न्यूजच्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तान एकटाच लढत राहिला नाही त्याच्या मदतीला चीन देखील आला. चीनने आपल्या सरकारी माध्यमांमार्फत फेक न्यूज पसरवल्याचे भारतीय सैन्य दलाने उघड्यावर आणले.
पाकिस्तानने काल रात्री जम्मू-काश्मीर ते राजस्थानातले जैसलमेर इथपर्यंत 60 मिसाईल आणि ड्रोन हल्ले केले. परंतु त्या देशाने फेक न्यूजचे हल्ले जास्त प्रमाणात वाढविले. भारताने पाकिस्तानवर हल्ला करायला 80 विमाने पाठविली, असा दावा त्यांचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी पाकिस्तानी नॅशनल असेंब्लीत केला.
भारताने लाहोरमध्ये केलेले हल्ल्यात पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट केली, पण पाकिस्तानने मात्र भारताची तीन विमाने पाडल्याचा दावा केला. त्या पाठोपाठ जम्मूतल्या लष्करी तळावर आत्मघाती हल्ला झाला, जम्मूचा एअर बेस उद्ध्वस्त केला, भारताची 15 मिसाईल आणि ड्रोन पाकिस्तानने पाडले, मुजफ्फराबाद मध्ये सुखोई विमान पडले, पाकिस्तानी गुजरात मधल्या हाजीरा विमानतळावर हल्ला केला, पंजाब मध्ये जालंधर मध्ये ड्रोन हल्ला केला, या सगळ्या फेक न्यूज पाकिस्तानी सोशल मीडिया हँडलर्सनी व्हायरल केल्या. त्यासाठी लेबनान, बैरूत, काबुल मधल्या स्फोटांचे आणि हल्ल्यांचे फोटो आणि व्हिडिओ वापरले. सुखोई विमान पडल्याचा 2014 चा भारतातलाच फोटो कॉपी करून वापरला. प्रत्यक्षात या सगळ्या फेक न्यूज असल्याचे भारतीय सैन्य दलाने पुराव्यांसह स्पष्ट केले.
पण फेक न्यूज पसरविण्यामध्ये केवळ पाकिस्तानच आघाडीवर राहिला असे नाही, तर चीनने देखील पाकिस्तानला त्यासाठी साथ दिली. China daily या चिनी सरकारी मीडियाने भारतातल्या The Hindu दैनिकाच्या हवाल्याने एक फेक न्यूज पसरवली. काश्मीरमध्ये भारतीय हद्दीत भारताची 3 विमाने कोसळल्याची बातमी The Hindu ने दिल्याचा China daily ने दावा केला. त्यात एक विमान कोसळल्याचा फोटो शेअर केला. प्रत्यक्षात 2019 मध्ये भारतात झालेल्या विमान अपघाताचा तो फोटो होता. भारतीय सैन्य दलाने चिनी माध्यमाची ही फेक न्यूज उघड्यावर आणली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App