विशेष प्रतिनिधी
सोलापूर : Asaduddin Owaisi डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे एक दिवस हिजाब घालणारी महिलाही भारताची पंतप्रधान होईल, असा ठाम विश्वास एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैंसी यांनी शुक्रवारी येथील एका सभेत बोलताना व्यक्त केला. यावेळी त्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. अजित पवारांना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत. राष्ट्रवादीला मत म्हणजे मोदींनी आणलेल्या वक्फ कायद्याला पाठिंबा, असे ते म्हणाले.Asaduddin Owaisi
सोलापूरचे एमआयएमचे माजी शहराध्यक्ष तौफिक शेख यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते सध्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या मैदानात आहेत. असदुद्दीन ओवैसी यांनी शुक्रवारी त्यांच्याविरोधात सभा घेतली. यावेळी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. तसेच एक दिवस हिजाब घालणारी महिला या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला.Asaduddin Owaisi
..पण तो दिवस पाहण्यासाठी मी जिवंत नसेन
ओवैसी म्हणाले, आपण सोलापूरला पुण्यासारखे सुंदर बनवू शकतो. भाजपचे लोक इथे एवढ्या वर्षांपासून राहत आहेत. पण काहीच करत नाहीत. पाकिस्तानच्या राज्यघटनेत एकाच धर्माचा माणूस राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो असे नमूद आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार कोणताही व्यक्ती भारतीय पंतप्रधान होऊ शकतो. एक दिवस असा येईल जेव्हा हिजाब घालणारी महिला या देशाची पंतप्रधान बनेल. पण कदाचित तो दिवस पाहण्यासाठी मी जिवंत नसेन. पण एक दिवस हा दिवस नक्की उजडेल.
ते पुढे म्हणाले, मी देशाच्या संसदेत बोलणारा माणूस आहे. अजित पवार हे नरेंद्र मोदी यांच्या मांडीवर जाऊन बसलेत. त्यामुळे त्यांना मत देणे हे नरेंद्र मोदींना मत देण्यासारखे आहे. अजित पवारांना मत म्हणजे मोदींनी आणलेल्या वक्फ कायद्याला समर्थन. अजित पवारांना दर्गा, मशिदीशी काहीही देणेघेणे नाही. पण आपल्याला आहे. मोदी, शिंदे, अजित पवार ही एकच त्रिमूर्ती आहे. ते तुमच्यापुढे येऊन तुमच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न करतली. पण त्यांना तुम्ही मतपेटीतून उत्तर द्या. एमआयएम हा गरिबांचा पक्ष आहे. तो गरिबांसाठी काम करतो.
..तर मग मी तुमच्या बापावर बोलेन
कुणी तरी माझ्या शेरवाणीला हात घालण्याचे विधान केले. त्यांनी त्यांच्या राजकीय बापाला म्हणजे अजित पवारांना माझ्यापुढे आणून बसवावे. मी त्यांना 3 मिनिटांत मूके केले नाही तर मग सांगा. येथील नई जिंदगी परिसरातूनच काही वर्षांपूर्वी एमआयएमला संजिवनी मिळाली. आज पुन्हा येथील जनतेने एमआयएमच्या मागे उभे राहण्याची गरज आहे. भाजप, आरएसएस, अजित पवार व शिंदे गटाचे लोक या परिसराला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी एवढेच लक्षात घ्यावे की, हा परिसर माझा आवडता आहे. हा परिसर सोलापूरचे हृदयस्थान आहे. त्यामुळे तुम्ही या परिसराविषयी काही बोललात, तर मग मी तुमच्या बापावर बोलेन, असा इशाराही असदुद्दीन ओवैसी यांनी यावेळी आपल्या विरोधकांना दिला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App