विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गुप्तहेर बनण्याची सुवर्णसंधी तरुणांना आली असून गुप्तचर विभागात ५२७ पदांसाठी भरती होणार आहे. उपसंचालक, ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर, सीनियर रिसर्च ऑफिसर, रिसर्च असिस्टंट, असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर, असिस्टंट जनरल इंटेलिजन्स एक्झिक्युटिव्ह, अकाऊंटंट, सुरक्षा अधिकारी, स्टाफ नर्स, केअरटेकर यासह इतर पदावर भरती करण्यात येणार आहे.A golden opportunity to become a spy, 527 posts will be recruited in the intelligence department
शैक्षणिक पात्रताविविध पदानुसार ,दहावी, बारावी, पदवी अशी पात्रता निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांकडे ड्रायव्हिंग लायसन्स देखील असणं आवश्यक आहे. विविध पदांसाठी वयोमयार्दा निश्चित करण्यात आली आहे. जास्तीत जास्त वयोमयार्दा 56 वर्ष निश्चित करण्यात आली आहे. एसी, एसटी, ओबीसी, दिव्यांग उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
पदांचा तपशील पुढीलप्रमाणे :
उपसंचालक – 2, डेप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर – 10ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर – 168, सीनियर रिसर्च ऑफिसर – 02, रिसर्च असिस्टंट – 2, सिनिअर फॉरेन लँग्वेज – 1, असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर – 2, असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर एक्झिक्युटिव्ह – 56, असिस्टंट ज्युनिअर इंटेलिजन्स एक्झिक्युटिव्ह – 96, ज्युनिअर इंटेलिजन्स ऑफिसर – 13, पर्सनलअसिस्टंट: 02, अकाऊंट आॅफिसर: 03, अकाउंटंट: 24, सिक्युरिटी ऑफिसर – 08, असिस्ंटट सिक्युरिटी आॅफिसर – 12, असिस्ंटट सिक्युरिटी ऑफिसर (टेक्निकल) – 10, फिमेल स्टाफ नर्स – 01, ज्युनिअर इंटेलिजन्स आॅफिसर – 52, सिक्युरिटी असिस्टंट – 20, केअरटेकर – 05, हलवाई कुक – 11, मल्टी टास्किंग स्टाफ – 24, लायब्ररी अटेंडंट – 01.
गुप्तचर विभागाच्या वेबसाईटवर उमेदवारांना अर्ज करता येईल. अर्ज डाऊनलोड करुन त्याची प्रिंटआऊट काढून सर्व माहिती भरून पोस्टानं पाठवायचा आहे. अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत 21 ऑक्टोबर आहे. अर्ज जॉईंट डेप्युटी डायरेक्टर/ इंटेलिजन्स ब्युरो, मिनिस्ट्री ¸ऑफ होम अफेअर्स, 35 एस पी मार्ग, बापू धाम, नवी दिल्ली – 110021, येथे पाठवायचा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App