लोकांचे श्वास अटकला अन् मग पुढे काय झाले जाणून घ्या?
विशेष प्रतिनिधी
Kochi चेन्नईहून कोचीला जाणाऱ्या खासगी विमानात तांत्रिक बिघाड झाला. हे कळताच विमानातील सर्व प्रवाशांचे श्वास अटकला. तांत्रिक बिघाड आढळून आल्यानंतर विमानाचे चेन्नईत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानतळ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, विमानात १०० हून अधिक प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते.Kochi
सर्व प्रवासी आणि इतर सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान 117 प्रवाशांना घेऊन चेन्नईहून कोचीसाठी रवाना झाले होते. जेव्हा पायलटला ‘तांत्रिक बिघाड’ आढळला तेव्हा विमान हवेतच होते. यानंतर विमान चेन्नईला परत नेण्यात आले.
वैमानिकाने विमानतळ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली ‘इमर्जन्सी’ मोडमध्ये विमान उतरवले. लँडिंगदरम्यान आवश्यक सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या आणि विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App