वैष्णवी ढेरे
नॅशनल युथ पार्लमेंट फेस्टिवल 2023 आत्ताच संसदेच्या केंद्रीय सभागृहात झाला. वेगवेगळ्या राज्यांचे बरेच विद्यार्थी यात सहभागी होताना दिसले. 1 आणि 2 मार्चला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत हा फेस्टिवल झाला. A festival that turns the youth towards democratic decisions!
सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपापली भूमिका खूप उत्तमपणे मांडली आहे. आस्था शर्मा, निलेश छेत्री, माहिरा खान या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. त्याला मान्यवरांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.
मला स्वतःला विद्यार्थी म्हणून सगळ्यांचीच भाषणे आवडली. पण अरुणाचल प्रदेशच्या आस्था शर्मा हिने मांडलेले काही मुद्दे मात्र मनात प्रश्न निर्माण करणारे ठरले. ‘Future Youth in democracy and governance’ याबाबतीत तिने मांडलेले काही मुद्दे हे मनात घरात करणारे ठरले. तर काहींनी प्रश्न तयार केले. युथ पार्टिसिपेशन इन डेमोक्रेसी हे हळूहळू कमी होत चालले आहे. आपण आपले फ्युचर खूप वेगळ्या पद्धतीने बघतो. बेस्ट इन फास्ट स्ट्रक्चर, बेस्ट हायर एज्युकेशन, हेल्थकेअर सिस्टीम अशी स्वप्न पाहणारा हा देश आहे. पण खरंच भारतातील यंग जनरेशन तसाच विचार करते का?
“युवा ही देश का भविष्य है. अखंड राष्ट्र के भविष्य का निर्माण करणे की योग्यता राखता है”. फक्त त्यांना काही चांगल्या रिसोर्सेसची गरज आहे. आणि एका चांगल्या संधीची वाट ते बघत आहेत. पण हेच करताना यंग जनरेशनचा डेमोक्रेसी मधला इंटरेस्ट कमी होताना दिसत आहे. आणि तो का होतो आहे. याहीपेक्षा त्यावर सोल्युशन्स कशी शोधता येतील याकडे लक्ष दिल्यावर कळते की यंग जनरेशन मला डिसिजन मेकिंग मध्ये सामील करून घेतले पाहिजे. त्या प्रोसेस मधनं त्यांना जाऊ दिले पाहिजे. नवीन पॉलिसीस त्यांच्या इंटरेस्ट नुसार तयार झाल्या पाहिजेत. त्यांच्याकडून त्यांचे नवीन पर्स्पेक्टिव्ह समजून घेतले पाहिजेत. आणि यातूनच युथ डेमोक्रेसी कडे वळणार आहे.
आस्था शर्माच्या या भाषणामुळे मला स्वतःला देखील तिचे काही मुद्दे पटले. तू लहान आहेस तुला काही कळत नाही. या गोष्टीपेक्षा त्यांची मते देखील ऐकून घेतली पाहिजेत. युथला डिसिजन मेकिंगचा हक्क दिला पाहिजे. आपल्याकडून सत्ता जाईल म्हणून पुढच्या जनरेशनला चान्सच द्यायचा नाही. असे न करता स्वतःहून त्यांना डिसिजन मेकिंग मध्ये इन्व्हॉल्व करून घेतले पाहिजे. हायर एज्युकेशन साठी, गुड हेल्थकेअर सिस्टीम साठी आणि इतर पॉलिटिकल डिसिजन मध्ये देखील त्यांना इन्व्हॉल्व करत, त्यांचे काही परस्पेक्टिव्ह जाणून घेत. ते अप्लाय करण्याचे संधी त्यांना दिली गेली पाहिजे. त्यातूनच यंग जनरेशन ही फक्त मतदान करण्यासाठी उरणार नाही, तर डेमोक्रसी मध्ये सुद्धा तेवढ्याच इंटरेस्टने कार्यरत राहताना दिसेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App