जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण आणि कोणी दाखल केला आहे खटला?
विशेष प्रतिनिधी
हरिद्वार : Rahul Gandhi Defamation Case – काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. परदेशात जाऊन भारतीय संसदेबद्दल केलेलं वादग्रस्त विधान, मोदी आडनाबद्दलची अपमानस्पद टिप्पणी यानंतर गेलेलं संसद सदस्यत्व आणि दिल्लीतील शासकीय निवासस्थान गमावल्यानंतर आता राहुल गांधींविरोधात आणखी एक मानहानीचा खटला दाखल झाला आहे. A defamation case has been filed against Congress leader Rahul Gandhi by RSS worker Kamal Bhadauria in Haridwar court
राहुल गांधींविरोधात आता उत्तराखंडमध्ये मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे., राहुल गांधी यांनी हरियाणात म्हटले होते की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे २१ व्या शतकातील कौरव आहेत. यामुळे आरएसएस कार्यकर्ता कमल भदोरिया यांनी हरिद्वार कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला आहे. ही बाब ग्राह्य धरून न्यायालयाने १२ एप्रिल रोजी सुनावणीची तारीख निश्चित केली आहे. कमल भदोरिया यांनी म्हटले आहे की, मी आरएसएसचा कार्यकर्ता असल्याने राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे मी दुखावलो आहे. त्यामुळे त्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याबाबत हरिद्वार कोर्टात केस दाखल केली आहे.
Haridwar, Uttarakhand | A defamation case has been filed against Congress leader Rahul Gandhi by RSS worker Kamal Bhadauria in Haridwar court. Hearing is on April 12. Rahul Gandhi said in Haryana that RSS is the Kaurava of 21st century: Arun Bhadauria, Advocate pic.twitter.com/nhOjG2lZtm — ANI (@ANI) April 1, 2023
Haridwar, Uttarakhand | A defamation case has been filed against Congress leader Rahul Gandhi by RSS worker Kamal Bhadauria in Haridwar court. Hearing is on April 12. Rahul Gandhi said in Haryana that RSS is the Kaurava of 21st century: Arun Bhadauria, Advocate pic.twitter.com/nhOjG2lZtm
— ANI (@ANI) April 1, 2023
खरंतर, ९ जानेवारी २०२३ रोजी कुरुक्षेत्र अंबाला येथे राहुल गांधी यांनी आरएसएसचे वर्णन २१ व्या शतकातील कौरव असे केले होते. राहुल गांधी म्हणाले होते की, आजचे कौरव खाकी हाफ पँट घालतात आणि हातात काठ्या घेतात. या संदर्भात आरएसएस कार्यकर्ता कमल भदोरिया यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती, ज्यामध्ये कमल भदोरिया म्हणाले की, देशात कुठेही कोणत्याही आपत्तीमध्ये आरएसएस महत्त्वाची भूमिका बजावते. कमल भदोरिया यांचे वकील अरुण भदोरिया यांच्या वतीने हा खटला दाखल करण्यात आला आहे.
१२ एप्रिल तारीख निश्चित केली आहे –
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते कमल भदोरिया म्हणाले की, देशवासीयांच्या भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुडलेल्या आहेत. असे असतानाही राहुल गांधी यांनी असे विधान केले आहे. देशात कुठेही कोणत्याही आपत्तीत आरएसएस महत्त्वाची भूमिका बजावते आणि राहुल गांधींच्या वक्तव्याने संघाचा कार्यकर्ता म्हणून आपण दुखावलो, असे त्यांनी आपल्या दाव्यात म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याबाबत हरिद्वार कोर्टात केस दाखल केली आहे. न्यायालयाने ही बाब मान्य करत सुनावणीची तारीख १२ एप्रिल निश्चित केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App