विशेष प्रतिनिधी
चंडीगढ़ : देवभूमी हिमाचल प्रदेशातील सभ्या बहल ही अवघी २२ महिन्यांची बालिका गायत्री मंत्र म्हणते. याची नोंद इंडिया बुक रेकॉर्डमध्ये झाली आहे. केवळ २० सेकंदात आपल्या बोबड्या बोलाने गायत्री मंत्र म्हणणारी सभ्य सध्या चर्चेत आहेत.A 22-month-old community in Himachal Pradesh says Gayatri Mantra, is a record in the India Book of Records
हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा जिल्ह्यातील चीलगाडी येथे राहणाऱ्या सभ्याचा जन्म २४ फेब्रुवारी, २०२० रोजी झाला. तिने ८ जानेवारी २०२२ रोजी आपल्या विक्रमाची नोंद इंडिया बुक रेकॉर्डमध्ये केली. राभ्या हिला त्याबद्दल पदक आणि प्रमाणपत्र प्रदान केले गेले. राभ्या हिने तिची आई रूपम बहल हिला गायत्री मंत्राचा जप करताना ऐकले होते
तेव्हा ती १ वर्ष १० महिन्यांची होती. राभ्याने आईसोबत बोबड्या भाषेत गायत्री मंत्र उच्चारणे सुरू केले होते. राभ्या २० सेकंदांत गायत्री मंत्राशिवाय शरीराच्या अवयवांची आणि फळांची आणि फलकावर लिहिलेल्या वस्तूंची नावे झटपट सांगते. गायत्री मंत्राच्या उच्चारणाचा विक्रम आतापर्यंत २ वर्षांच्या मुलीच्या नावावर होता.
गायत्री मंत्र म्हणण्याच्या सभ्याचा व्हिडीओ कुटुंबाने काढला होता. तो इंडिया बुक रेकॉर्डसकडे पाठविण्यात आला. त्यांनी या विक्रमाची नोंद केली आहे. सभ्या केवळ गायत्री मंत्र म्हणते असे नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या भूमितीय आकृत्या, फळे, किटकांची नावेही सागते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App