विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाने देशात चांगलच थैमान घातलाय आहे. यावर उपाय म्हणुन देशभरात सगळ्यांना कोरोनावर मात करण्यासाठी लस देण्यात आल्या आहेत. या लसींच वाटप वयोमानानुसार करण्यात आलं. तसेच सरकारी कर्माचार्यांनासुध्दा प्राधान्य देण्यात आले.बर्यापैकी सगळीकड लसीकरण झालय.98 per cent defense personnel get both doses of corona vaccine: Minister of State for Defense Ajay Bhatt.
यातच भारतीय लष्कराच्या ९८ टक्के जवानांना कोरोना साथीच्या आजार विरूद्ध लसी देण्यात आली आहे. यामध्ये सीमेवर तैनात सैनिकांचा समावेश आहे. उर्वरित दोन टक्के लोकांनाही प्रथम डोस मिळाला आहे.
सोमवारी सरकारने सांगितले की भारतीय सैन्यात काम करणाऱ्या सर्व संरक्षण कर्मचार्यां पैकी ९८ टक्के लोकांना अँटी-कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. उर्वरित दोन टक्के संरक्षण कर्मचाऱ्यांनाही प्रथम डोस देण्यात आला आहे.
संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. भट्ट म्हणाले की सीमावर्ती संघटनेच्या (बीआरओ) सीमेवर तैनात असलेले कर्मचारी आणि कर्मचार्यां सह सर्व कार्यरत संरक्षण कर्मचार्यांना लसी देण्याचे काम 16 जानेवारीपासून सुरू झाले होते. पुढे ते म्हणाले की ,आतापर्यंत 100% संरक्षण कर्मचा्यांना पहिला डोस मिळाला आहे. त्यापैकी ९८ टक्के लोकांना दुसरा डोसही मिळाला आहे.
सरकार देशाच्या सुरक्षेची गरजांची काळजी घेत आहे. याचा वेळोवेळी आढावाही घेतला जातो. देशाचे सार्वभौमत्व, अखंडता आणि सुरक्षेसाठी रस्ते व बोगदा बांधकाम, रणनीतिक दृष्टीकोनातून रेल्वे मार्गाचा विकास करणे यासारख्या पायाभूत सुविधांची कामे केली जात आहेत.
सैन्याच्या गरजेनुसार बीआरओ सीमावर्ती भागात रस्ते बनवतात. यापैकी भारत-चीन सीमेवर रस्त्यांचे बांधकाम महत्वाचे आहे. या 4203 कि.मी. लांबीच्या रस्त्यांना प्रथम प्राधान्य दिले जात आहे आणि त्यासाठी निधीची विशेष व्यवस्थादेखील केली आहे. असं देखील भट्ट म्हणाले.
संरक्षण व राज्यमंत्री अजय भट्ट यांनी माहिती दिली की सीमा व दुर्गम भागांना हवामान रस्ता जोडण्यासाठी विविध पासवर बोगदेही बांधले जात आहेत. सद्यस्थितीत अशा चार बोगद्या तयार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App