वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात 2014 ते 2022 या कालावधीत तब्बल 97000 कोटी रुपयांची ड्रग्स जप्त करून जाळली आहेत. ड्रग्सच्या पैशातून होणारे टेरर फंडिंग रोखले आहे, अशी महत्त्वपूर्ण माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत दिली. त्याच वेळी त्यांनी सीमावर्ती राज्यांमध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात सीमा सुरक्षा दल आणि अन्य केंद्रीय सुरक्षा एजन्सीचे अधिकार वाढविल्याबद्दल केंद्र सरकारवर दोषारोप करणाऱ्या विशिष्ट राज्य सरकारांना कानपिचक्या दिल्या. 97,000 crore worth of drugs burnt; But some states are upset about the increased powers of the BSF
यूपीए सरकारच्या कालावधीतील ड्रग्स विरोधी मोहीम आणि 2014 नंतर केंद्रातील मोदी सरकारच्या कालावधीतील ड्रग्स विरोधी मोहीम यातला गुणात्मक फरक अमित शाह यांनी लोकसभेत लक्षात आणून दिला. त्यांनी 2006 ते 2013 या कालावधीत ड्रग्स जप्ती आणि 2014 ते 2022 या काळातली ड्रग्स जप्तीची तपशीलवार आकडेवारी सादर केली. केंद्र सरकारने सर्व सीमावर्ती राज्यांमध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अर्थात सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय सुरक्षा एजन्सी अधिकार वाढवून दिले आहेत.
त्यामुळे ड्रग्स तस्करी नुसती रोखलीच जाते असे नाही, तर ड्रग्स तस्करांना कायद्याचा बडगा देखील दाखविता येणे शक्य होते. त्याचबरोबर ड्रग्स विरोधी झिरो टॉलरन्स मोहिमेला चालना मिळते. तस्करांविरुद्ध परिणामकारक खटले लढवून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा करता येते. बीएसएफ आणि अन्य केंद्रीय सुरक्षा एजन्सीसचे अधिकार वाढवून ते सीमावर्ती राज्यांमध्ये सीमेपासून आत मध्ये तब्बल 50 किलोमीटर पर्यंत कारवाई करू शकतात. याला कायदेशीर वैधता प्राप्त करून दिली आहे. मात्र पश्चिम बंगाल आणि पंजाब या राज्यांनी त्यावर आक्षेप घेतला आहे, याकडे अमित शाह यांनी लक्ष वेधले.
बीएसएफ अथवा कोणत्याही केंद्रीय सुरक्षा एजन्सी या परकीय एजन्सीज नाहीत, तर त्या देशाच्या महत्त्वाच्या सुरक्षा एजन्सीज आहेत. त्यामुळे त्यांचे अधिकार वाढवण्यात गैर काय??, असा सवाल करून त्यांनी त्यांच्या अधिकारांना कात्री लावण्यास ठाम नकार दिला. तसेच जे अधिकाऱ्यांना कात्री लावण्याची मागणी करतात ते एक प्रकारे ड्रग्स तस्करीला पाठिंबास देतात, अशी घणाघाती टीका अमित शाह यांनी केली.
तृणमूळ काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार सुगता राय यांनी अमित शाह यांच्या भाषणात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अमित शहा यांनी सुगता रॉय यांनाही तुमच्यासारख्या जेष्ठ सदस्याला हे शोभत नाही, अशा शब्दांत ठणकावले.
https://youtu.be/ZcsjwcnLdjs
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App