भारतात अवघ्या 6 महिन्यांत 95 वाघांचा मृत्यू, मध्य प्रदेशात या वर्षी आतापर्यंत 24 वाघांचा मृत्यू


प्रतिनिधी

नवी दिल्ली : विशाखापट्टणमच्या इंदिरा गांधी प्राणी उद्यानात 24 तासांत आणखी दोन वाघांचा मृत्यू झाला. त्याचवेळी, या वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांत देशात 95 हून अधिक वाघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तराखंड या तीन राज्यांमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.95 tigers killed in just 6 months in India, 24 tigers killed in Madhya Pradesh so far this year

इंदिरा गांधी प्राणिसंग्रहालयातील जानकी (22) या वाघिणीचा वृद्धापकाळामुळे मृत्यू झाला. तिच्या शरीराचे अवयव काम करणे बंद झाले होते. त्याचवेळी एआरसी (अ‍ॅनिमल रेस्क्यू सेंटर) मध्ये कुमारी (२३) नावाच्या वाघिणीचाही रात्री उशिरा मृत्यू झाला. झूलॉजिकल पार्कच्या ‘क्युरेटर’ नंदनी सलारिया यांनी सांगितले की, वाघिणीचे वय सरासरीपेक्षा जास्त आहे.



वनमंत्रालयाने दिले चौकशीचे आदेश

या वर्षी एप्रिलमध्ये प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 च्या व्याघ्रगणनेची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार 2018 पासून देशात 200 वाघ वाढले आहेत, मात्र 2023 च्या पहिल्या सहा महिन्यांत निम्म्या वाघांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणानुसार, यावर्षी 25 जूनपर्यंत देशभरात 95 वाघांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात सर्वाधिक 24, महाराष्ट्रात 19 आणि उत्तराखंडमध्ये 14 वाघांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी केंद्रीय वन मंत्रालयाने सर्व राज्यांमध्ये चौकशीचे आदेश दिले आहेत.

उत्तराखंडमध्ये अभयारण्याबाहेर 7 वाघांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेर कुमाऊँ प्रदेशात सर्वाधिक 7 वाघांचा मृत्यू झाला, तर कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पात 5 वाघ आणि राजाजी व्याघ्र प्रकल्पात 2 वाघांचा मृत्यू झाला. अलीकडे, कॉर्बेटच्या कलागढ रेंजमध्ये एक जखमी वाघीणही आढळून आली होती, जिच्या पोटाभोवती लोखंडी तारांचा फास अडकला होता.

केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाचे महासंचालक सीपी गोयल म्हणतात की लोकसंख्येच्या वाढीसह जंगलांवर अतिक्रमणाचा दबाव वाढत आहे. 2021 मध्ये उत्तराखंडमध्ये तीन वाघांचा मृत्यू झाला आणि 2022 मध्ये एकूण सहा वाघांचा मृत्यू झाला.

मध्य प्रदेश प्रथम, कर्नाटक द्वितीय

2018 च्या जनगणनेनुसार, 526 वाघांसह मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. कर्नाटक 524 वाघांसह दुसऱ्या तर 442 वाघांसह उत्तराखंड तिसऱ्या क्रमांकावर आहे.

95 tigers killed in just 6 months in India, 24 tigers killed in Madhya Pradesh so far this year

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात