NDRF टीम घटनास्थळी पोहोचली, बचाव मोहीम सुरू
विशेष प्रतिनिधी
लुधियाना : पंजाबमधील लुधियानामध्ये विषारी वायू गळतीमुळेन नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर या दुर्घटनेत अनेकजण बेशुद्ध झाले आहेत. घटनास्थळी गोंधळाचे वातावरण आहे. नाकाबंदी करत पोलीस कोणालाही घटनास्थळी जाऊ देत नाहीत. बचाव मोहीम राबवून लोकांना घरातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेण्यात येत आहे. 9 dead many unconscious due to toxic gas leak in Ludhiana
लुधियानाच्या गयासपूर भागात ही दुर्घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गयासपूर परिसरात अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. रुग्णवाहिकेचीही व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अचानक गॅस गळती झाल्याने चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. जवळच्या कारखान्यातून वायू गळती झाल्याचा दावा त्यांनी केला.
लुधियाना पश्चिमच्या एसडीएम स्वाती यांनी सांगितले की, ही गॅस गळतीचीच घटना आहे. एनडीआरएफची टीम येथे पोहोचली आहे. लोकांना वाचवण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक पथक तपासानंतर गॅस गळतीचा स्रोत उघड करेल. तज्ज्ञांची टीम गॅस कोणता आहे हे देखील उघड करेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App