वृत्तसंस्था
नवी दिल्ली : चिनी मोबाइल कंपन्या भारतात कस्टम ते जीएसटी असे कर चुकवत आहेत. राज्यसभेत आयटी मंत्रालयाने दिलेल्या लेखी उत्तरानुसार, चिनी मोबाईल कंपन्यांनी गेल्या 5 वर्षांत सुमारे 8000 कोटी रुपयांचा कर चुकवला आहे.8000 crore tax evaded by Chinese mobile companies, including 7,965 customs duty and 1108 GST; 1,629 recovered
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या चिनी मोबाईल कंपन्यांनी 7,965 कोटी कस्टम ड्युटी चुकवली आहे. तर, जीएसटी चोरीच्या प्रकरणात ही रक्कम 1108 कोटी रुपये होती. ज्या चिनी कंपन्यांची नावे करचुकवेगिरीत समोर आली आहेत त्यात Oppo, Vivo, Xiaomi आणि Transition सारख्या सुप्रसिद्ध मोबाइल ब्रँडचा समावेश आहे. या कंपन्यांकडून 1,629 कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे.
Oppo ने 5,086 कोटींचा कर चोरला
आकडेवारीनुसार, Oppo Mobile India Pvt Ltd ने या कालावधीत 5,086 कोटी रुपयांचा कर चुकवला आहे. ज्यामध्ये 4,403 कोटी सीमाशुल्क आणि 683 कोटींचा GST समाविष्ट आहे. कंपनीने 2019-20 या आर्थिक वर्षात 4,389 कोटी रुपयांची कस्टम ड्युटी चुकवली, त्यापैकी 450 कोटी रुपये वसूल करण्यात आले.
Vivo ने 2,923.25 कोटी कर भरला नाही
Vivo ने 2,923.25 कोटी रुपयांचा कर चुकवला. ज्यामध्ये 2,875 कोटी कस्टम आणि 48.25 कोटी GST समाविष्ट आहेत. त्याच वेळी विवोने 2,217 कोटी रुपयांचे कस्टम ड्युटी चुकवली. त्यापैकी 72 कोटी रुपये आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये वसूल करण्यात आले. 2022-23 या आर्थिक वर्षात Vivo Mobile India Pvt Ltd ची 658 कोटी रुपयांची कर चोरी झाली.
Xiaomi ने 851.14 कोटी कर भरला नाही
Xiaomi Technology India Private Limited ने 851.14 कोटी कर भरला नाही. यामध्ये ६८२.५१ कोटी कस्टम ड्युटी आणि १६८.६३ कोटी जीएसटीचा समावेश आहे. Xiaomi 2019-20 या आर्थिक वर्षात 653.02 कोटी रुपयांचे कस्टम ड्युटी चुकवताना पकडले गेले. त्यापैकी 46 लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. तर, लेनोवोने 42.36 कोटी रुपयांचा जीएसटी चुकवला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App