प्रतिनिधी
नवी दिल्ली : एअर इंडियाने विमान वाहतूक क्षेत्रातील सर्वात मोठा करार केला आहे. टाटा सन्स या एअर इंडियाची मालकी असलेल्या कंपनीने म्हटले आहे की, एअरलाइन सुरक्षा, ग्राहक सेवा, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, नेटवर्क आणि मानव संसाधनांच्या दिशेने मोठ्या परिवर्तनाच्या प्रवासावर आहे. टाटा समूह ट्रिलियन डॉलर्स खर्चून अत्याधुनिक बोईंग आणि एअरबस विमाने खरेदी करणार आहे.80 Billion Dollars, 4 Countries, 470 Aircraft Purchase: Know Why Air India’s Historic Deal Is Important?
टाटा समूह एकूण 470 विमाने खरेदी करणार आहे. टाटाने विमान वाहतूक क्षेत्रातील आघाडीची कंपनी, अमेरिकेची बोइंग आणि युरोपची एअरबस यांच्याशी हा करार केला आहे. खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या करारासाठी भारताचे अभिनंदन केले आहे यावरून या कराराचे महत्त्व समजू शकते.
याशिवाय यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनीही या कराराचे त्यांच्या देशासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे वर्णन केले आहे. सुनक यांनी भारतासोबत व्यावसायिक संबंध सुरू ठेवण्यावरही भर दिला. जर आपण रक्कम पाहिली तर हा करार 80 अब्ज डॉलर्स म्हणजेच 6.40 लाख कोटी रुपयांचा आहे.
टाटा समूहाच्या एअर इंडियाने काय खरेदी केले?
ऑर्डरमध्ये 40 Airbus A350s, 20 Boeing 787s आणि 10 Boeing 777-9s वाइड-बॉडी विमाने, तसेच 210 Airbus A320/321 Neos आणि 190 Boeing 737 MAX सिंगल-आइसल विमानांचा समावेश आहे.
अशा प्रकारे एअर इंडिया एकूण 470 विमाने खरेदी करणार आहे. यामध्ये बोईंगच्या 220 आणि एअरबसच्या 250 विमानांचा समावेश आहे.
Welcome to the 777X family @airindiain with the selection of 10 777-9s. These airplanes will connect India to almost any destination worldwide, non-stop, with enhanced comfort. Great looking airplane too! pic.twitter.com/dKJbZVafzn — Boeing Airplanes (@BoeingAirplanes) February 14, 2023
Welcome to the 777X family @airindiain with the selection of 10 777-9s. These airplanes will connect India to almost any destination worldwide, non-stop, with enhanced comfort. Great looking airplane too! pic.twitter.com/dKJbZVafzn
— Boeing Airplanes (@BoeingAirplanes) February 14, 2023
एअर इंडियाच्या ताफ्यात कधी सामीन होणार विमाने?
एअर इंडियाच्या मते, नवीन विमाने 2023च्या शेवटच्या महिन्यापर्यंत सेवेत येईल. 2025 च्या मध्यापर्यंत बहुतेक नवीन विमाने एअर इंडियाच्या ताफ्यात सामील होतील.
एअर इंडियाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखर यांनी सांगितले की, या नवीन विमानांमुळे एअरलाइन्सच्या ताफ्याचे आधुनिकीकरण होईल आणि त्यांचे जागतिक नेटवर्क मोठ्या प्रमाणावर वाढेल.
मॅक्रॉन, सुनक आणि बायडेन यांच्या प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअर इंडिया-एअरबस व्यवहाराला “ऐतिहासिक करार” म्हणून संबोधले, जे भारत आणि फ्रान्स यांच्यातील घनिष्ठ संबंधांचे प्रतिबिंबदेखील दर्शवते. एअरबसचे ऑपरेशन ब्रिटन आणि फ्रान्स या दोन्ही देशांमध्ये आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन म्हणाले की, एअर इंडियाने एअरबससोबत 250 विमानांच्या खरेदीसाठी केलेला करार भारत आणि फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक आणि मैत्रीपूर्ण भागीदारीमध्ये मैलाचा दगड ठरेल.
यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक म्हणाले की, एअर इंडिया, एअरबस आणि रोल्स-रॉयस यांच्यातील ऐतिहासिक करार यूकेच्या भरभराटीच्या एअरोस्पेस क्षेत्रासाठी अमर्याद वाढ असल्याचे दर्शविते. ते म्हणाले की, या करारामुळे डर्बी ते वेल्सपर्यंत उत्पादन क्षेत्रात चांगल्या पगाराच्या नोकऱ्या आणि नवीन संधी निर्माण होतील, यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या निवासस्थान 10 डाउनिंग स्ट्रीट येथून जारी केलेल्या निवेदनानुसार, भारत ही एक मोठी आर्थिक शक्ती आहे, जी 2050 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये मध्यमवर्गाचा सहभाग महत्त्वाचा असेल. आम्ही सध्या भारतासोबत मुक्त व्यापार करारावर वाटाघाटी करत आहोत, जे आमचे व्यावसायिक संबंध नवीन उंचीवर नेतील.
पंतप्रधान मोदींची राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याशी चर्चा
करारावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिका आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारीबद्दल समाधान व्यक्त केले आणि ते म्हणाले की, सर्व क्षेत्रांमध्ये जोमदार विकास होत आहे. या करारामुळे दोन्ही देशांमध्ये रोजगार निर्माण होईल, असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदींनी इतर अमेरिकन कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्याचे निमंत्रण दिले.
बायडेन म्हणाले, “एअर इंडिया आणि बोईंग यांच्यात 200 हून अधिक यूएस निर्मित विमाने खरेदी करण्याचा ऐतिहासिक करार आज जाहीर करताना मला अभिमान वाटत आहे.” पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह एअर इंडिया आणि बोईंग यांच्यातील ऐतिहासिक कराराचे चमकदार उदाहरण म्हणून स्वागत केले. बोइंग ही एक अमेरिकन कंपनी आहे.
कोणत्याही एअरलाइनद्वारे, कुठेही दिलेली सर्वात मोठी ऑर्डर
एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन म्हणाले की, कोणत्याही भारतीय विमान कंपनीने दिलेली ही केवळ सर्वात मोठी ऑर्डर नाही, तर कोणत्याही एअरलाइनने आतापर्यंत दिलेली सर्वात मोठी सिंगल एअरक्राफ्ट ऑर्डर आहे. ही ऑर्डर भारताच्या विलक्षण प्रमाणात वाढीच्या अनोख्या संधींची साक्ष देते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more