वृत्तसंस्था
न्यूयॉर्क : अमेरिकेत कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आठ लाखांच्या वर गेली आहे. यापैकी दोन लाख जणांचा मृत्यू हा लसीकरण मोहिम सुरु झाल्यानंतर झाला आहे. जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत अमेरिकेची लोकसंख्या चार टक्के असली तरी, जगातील एकूण कोरोना मृत्यूंमध्ये अमेरिकेचा वाटा १५ टक्के आहे. अमेरिकेत ६० टक्क्यांहून अधिक प्रौढ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. 8 lack peoples died in USA due to corona
दरम्यान ग्रीससह युरोपमधील काही देशांनी पाच ते ११ या वयोगटातील बालकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात केली आहे. ओमिक्रॉनचा वाढता संसर्ग आणि आगामी नाताळच्या सुट्यांचा काळ यामुळे लसीकरण मोहिमेला सर्व देशांनी वेग दिला आहे. इटली, हंगेरी आणि स्पेन या देशांनीही लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढविली आहे. संसर्गवाढीमुळे पालकही आपल्या मुलांच्या लसीकरणासाठी आग्रही असून ग्रीसमध्ये ३० हजार जणांनी त्यासाठी नोंदणीही केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App