विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्र सरकारने १ जानेवारी २०२० ते ३० जून २०२१ दरम्यान निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याच्या दरातील वाढीचा (Dearness Allowance) फायदा देण्याची घोषणा केली आहे.म्हणजेच जे कर्मचारी (Retired Central Government Employees)या कालावधीत निवृत्त झाले आहेत त्यांना रिटायरमेंटनंतर मिळणाऱ्या रकमेवर याचा परिणाम होणार आहे. 7th Pay Commission :Central government employees retires before 30th June will get benefit of hike in DA
या कर्मचाऱ्यांना आता अधिक फंड मिळणार आहे. या निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना किती लाभ मिळणार आहे याचे कॅल्क्युलेशनदेखील जाणून घेतले पाहिजे. जर तुमच्या कुटंबातील किंवा परिचयातील एखादा केंद्र सरकारचा कर्मचारी निवृत्त झाला असल्यास तुम्ही शेवटच्या बेसिक वेतनाच्या आधारावर याचे कॅल्क्युरलेशन करू शकता की त्यांना किती फायदा होणार आहे.
महागाई भत्त्याचा लाभ निवृत्त केंद्रिय कर्मचाऱ्यांना पुढीलप्रमाणे मिळणार आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याचे निवृत्तीआधी शेवटचे बेसिक वेतन ५०,००० रुपयांच्या आसपास आहे. तर त्यांना रिटायरमेंट फंड म्हणून मिळणारी ग्रॅच्युईटी आणि लीव्ह एन्कॅशमेंट यांची रक्कम जवळपास दीड लाखांनी वाढणार आहे. तर सातव्या वेतन आयोगाच्या सर्वात वरच्या पातळीवरील म्हणजे लेव्हल १८ मध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांना रिटायरमेंट फंडात जवळपास सव्वा सात लाख रुपयांचा लाभ होणार आहे. या श्रेणीतील अधिकाऱ्यांचे बेसिक वेतन दरमहा २,५०,००० रुपये आहे.
जे कर्मचारी जानेवारी २०२१ ते जून २०२१ या कालावधीत निवृत्त झाले आहेत त्यांना याचा सर्वाधिक लाभ होणार आहे. कारण त्यांच्या रिटायरमेंट फंडाचे कॅल्क्युलेशन ११ टक्के अधिक महागाई भत्त्याने होणार आहे. यानंतर जुलै २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे. या कर्मचाऱ्यांना तुलनेने कमी फायदा होईल कारण त्या कालावधीत महागाई भत्त्यात ७ टक्के वाढ झाली होती. त्यानंतर जानेवारी २०२० ते जून २०२० या कालावधीत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे. कारण त्यांचा महागाई भत्त्यात ३ टक्के वाढीचा फायदा मिळणार आहे.
महागाई भत्त्यात केंद्र सरकारने ११ टक्के वाढ केली आहे. त्यामध्ये जानेवारी ते जून २०२० या कालावधीत ३ टक्के, जुलै ते डिसेंबर २०२० पर्यत ४ टक्के आणि जानेवारी ते जून २०२१ या कालावधीसाठी ४ टक्के वाढ करण्यात आली आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार एन्ट्री लेव्हलच्या सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन ७,००० रुपयांवरून वाढवून १८,००० रुपये करण्यात आले आहे. तर क्लास-वन अधिकाऱ्यांची नियुक्ती आता किमान ५६,१०० रुपये इतक्या वेतनावर होणार आहे.
एकूण किती फायदा होणार (जानेवारी ते जून २०२१ दरम्यान निवृत्त होणारे लोक)
बेसिक वेतन = ५०,००० रुपये महिना
दीड वर्षात महागाई भत्त्यात ११ टक्के वाढ = ५,५०० रुपये महिना
बेसिक + महागाई भत्ता = ५५,५०० रुपये महिना
रिटायरमेंटवर ग्रॅच्युईटी + लीव्ह इन्कॅशमेंट = जवळपास १,४५,७५० रुपये
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App