मोदींनी दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि स्मृतीस्थळाला भेट दिली.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या ७२ फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले. नवी दिल्लीतील भाजपा मुख्यालयासमोरील उद्यानात हा विशाल पुतळा बसवण्यात आला. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज आपल्या सर्वांसाठीचे प्रेरणास्रोत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचा पवित्र सोहळा आहे, एक प्रेरणादायी प्रसंग ज्याने आपल्या सर्वांना नेहमीच चैतन्य दिले आहे.72 feet tall statue of Pandit Deendayal Upadhyay unveiled by PM Modi
मोदी म्हणाले की, कधीकधी असे वाटते की त्यांचे जीवन देखील रेल्वे ट्रॅकशी जोडलेले होते आणि माझे जीवन देखील रेल्वे ट्रॅकशी जोडलेले होते. मी आज सकाळी त्या पवित्र स्थळावरून थेट येथे आलो आहे आणि आज संध्याकाळी मला दिल्लीतील पंडित दीनदयाळ उपाध्याय पार्क येथे त्यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली आहे. हे अद्भुत आणि आनंददायी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या दौऱ्यावर होते. यादरम्यान मोदींनी जयपूरमध्ये भाजपच्या संकल्प महासभेला संबोधित केले. याचबरोबर पंतप्रधान मोदींनी जयपूर जिल्ह्यातील धनक्या गावात पंडित दीनदयाल उपाध्याय यांना श्रद्धांजली वाहिली. जयपूरपासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या धनक्या गावात उपाध्याय यांनी बालपण घालवले. या ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्मारक बांधण्यात आले आहे. मोदींनी दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि स्मृतीस्थळाला भेट दिली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App