भारतातील बिहारपासून बंगालपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले
विशेष प्रतिनिधी
Tibet तिबेटची भूमी आज भीषण भूकंपाने हादरली आहे. या भूकंपात तिबेटचे मोठे नुकसान झाले आहे. वृत्तसंस्था एएफपीने चिनी मीडिया शिन्हुआच्या हवाल्याने म्हटले आहे की, नेपाळच्या सीमेजवळील तिबेटमध्ये आज ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. या घटनेत 95 जणांचा मृत्यू झाला असून 53 जण जखमी झाले आहेत. आज सकाळी भारतापर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. बिहार, आसाम आणि पश्चिम बंगालसह देशातील अनेक भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.Tibet
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू 28.5 अंश उत्तर अक्षांश आणि 87.45 अंश पूर्व रेखांशावर होता. चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटरने जारी केलेल्या अहवालानुसार हा भूकंप 10 किलोमीटर खोलीवर झाला. भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक प्लेट्सची टक्कर होऊन हिमालय तयार होतो आणि वारंवार भूकंप होतात त्या भागात नेपाळ आहे. 2015 मध्ये नेपाळमध्ये 7.8 तीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्यामध्ये सुमारे 9,000 लोकांचा मृत्यू झाला होता आणि 22,000 हून अधिक लोक जखमी झाले होते. यामध्ये पाच लाखांहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) नुसार, सकाळी 6.35 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. एनसीएसच्या माहितीनुसार, भूकंपानंतर लगेचच या प्रदेशात आणखी दोन भूकंप झाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App