वृत्तसंस्था
बेंगलोर : कर्नाटक विधानसभेसाठी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत 229 मतदारसंघांमध्ये 65.69 % मतदान झाले. त्यानंतर झालेल्या तासाभरात प्रत्येक मतदारसंघांमध्ये मतदान केंद्रावर मोठी गर्दी होती. पण 2018 च्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटकात जे 72.13 % असे रेकॉर्ड मतदान नोंदविले गेले होते, तेवढे मतदान शेवटच्या तासाभरात होईल का?? ही टक्केवारी ओलांडली जाईल का??, याची उत्सुकता आहे. 65.69 % polling till 5.00 pm for Karnataka Assembly
1952 पासून 2018 पर्यंत कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 70 % पेक्षा जास्त कधीही मतदान झाले नव्हते. पण 2018 मध्ये 72.13% असे रेकॉर्ड मतदान नोंदविले गेले. 2023 च्या निवडणुकीत आज 10 मे 2023 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 65.69 % मतदान नोंदवले आहे. याचा अर्थ शेवटच्या तासाभरात 7.15 % मतदानाची नोंद झाली, तरच कर्नाटकचे मतदार 2018 चा रेकॉर्ड तोडतील.
कर्नाटक चुनाव में शाम 5 बजे तक 65.69% मतदान दर्ज हुए। pic.twitter.com/KCVJ0ee7Xm — ANI_HindiNews (@AHindinews) May 10, 2023
कर्नाटक चुनाव में शाम 5 बजे तक 65.69% मतदान दर्ज हुए। pic.twitter.com/KCVJ0ee7Xm
— ANI_HindiNews (@AHindinews) May 10, 2023
अर्थात सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत झालेले 65.69 % मतदान हे देखील कमी नाही. त्यामुळे कर्नाटकात जय बजरंग बलीची लाट आहे की काँग्रेसची 40 % च्या आरोपाची लाट आहे??, हे समजायला 13 मे पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App