वृत्तसंस्था
जगदलपूर : छत्तीसगड-तेलंगण ( Chhattisgarh-Telangan ) सीमेवर सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत सहा नक्षलवादी ठार झाले आहेत. यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. जवानांनी शस्त्रे आणि मृतदेह जप्त केले आहेत. दोन जवानांनाही गोळ्या लागल्या आहेत. परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. तेलंगणाच्या ग्रेहाऊंड पोलिसांना कोट्टगुडेम जिल्ह्यातील गुंडाला-करकागुडेम भागात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली होती. या आधारे एक दिवस आधीच शोध मोहिमेसाठी फोर्स पाठवण्यात आला होता.
दोन दिवसांतील हा दुसरा मोठा हल्ला आहे. यापूर्वी 3 सप्टेंबर रोजी दंतेवाडा-विजापूर सीमेवर 9 नक्षलवादी मारले गेले होते, आता तेलंगणा सीमेवर 6 नक्षलवादी मारले गेले आहेत.
ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये एक DVCM आणि ACM
आज सकाळीच सैनिक नक्षलवाद्यांच्या अड्ड्यावर पोहोचले. जिथे त्यांची चकमक झाली. दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. सैनिकांनी 6 मृतदेह बाहेर काढले आहेत
ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये एक डीव्हीसीएम (विभागीय समिती सदस्य), एक एसीएम (एरिया कमिटी सदस्य) आणि पक्षाच्या चार सदस्यांचा समावेश आहे. यातील 2 नक्षलवादी हे बस्तरमधील सुकमा आणि विजापूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
दंतेवाड्यात 59 लाख रुपयांचे इनामी माओवादी ठार
3 सप्टेंबर रोजी दंतेवाडा जिल्ह्यातील बैलादिला डोंगराच्या खाली वसलेल्या गावांच्या जंगलात चकमक झाली. सैनिकांनी तेलंगणातील रहिवासी डीकेएसझेडसी रणधीरसह 9 माओवाद्यांचा खात्मा केला होता. रणधीरवर 25 लाखांचे बक्षीस होते. ठार झालेले सर्व नक्षलवादी असून त्यांच्यावर एकूण 59 लाख रुपयांचे बक्षीस आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App