प्रतिनिधी
अयोध्या : उत्तर प्रदेशमध्ये पाचव्या टप्प्यात अमेठी, रायबरेली, सुलतानपूर, चित्रकूट, प्रतापगड, कौशांबी, प्रयागराज, बाराबंकी, अयोध्या, बहराइच, श्रावस्ती आणि गोंडा येथे मतदान सुरू होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५३.९८ टक्के मतदान झाले आहे. 53.98 per cent turnout till 5 p.m.Rae Bareli recorded the highest turnout of 60.66 per cent
त्याचवेळी कुंडा येथे सपा उमेदवार गुलशन यादव यांच्यावर हल्ला झाला आहे. त्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. दगडफेक आणि गोळीबारही झाला आहे. याशिवाय गोंडातील एसडीएम तारबगंजमधील घरात घुसून भाजपला मत देण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप सपाने केला आहे.
समाजवादी पार्टीचा आरोप आहे की प्रयागराज जिल्ह्यातील पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मध्ये बूथ क्रमांक १८७ ते १९० येथे भाजप उमेदवार सिद्धार्थ नाथ यांनी सपाच्या बूथ एजंटना बूथमधून हाकलून दिले. सिंग हे बनावट मतदान करत आहेत.
विविध मतदारसंघातील मतदान टक्केवारी : अमेठी ५२.७७ अयोध्या ५८.०१ बहराइच ५५ बाराबंकी ५४.६५ चित्रकूट ५९.६४ गोंडा ५४.३१ कौशांबी ५७.०१ प्रतापगढ़ ५०.२५ प्रयागराज ५०.८९ रायबरेली ६०.६६ श्रावस्ती ५७.२४ सुल्तानपूर ५४.८८
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App