232 पर्यटकांना घेऊन इंडिगोचे तिसरे विशेष विमान आज दुपारी श्रीनगर येथून निघेल आणि सायंकाळी मुंबईत पोहोचेल
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Kashmir पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्य सरकारच्या वतीने विशेष विमानांची व्यवस्था केली जात आहे. 232 पर्यटकांना घेऊन इंडिगोचे तिसरे विशेष विमान आज दुपारी श्रीनगर येथून निघेल आणि सायंकाळी मुंबईत पोहोचेल. काल दोन विशेष विमानांनी 184 पर्यटक मुंबईत पोहोचले होते. सुमारे 500 पर्यटक आतापर्यंत परतले आहेतKashmir
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने तातडीने हालचाली केल्या आहेत. सरकारने इंडिगो आणि एअर इंडिया या दोन कंपन्यांच्या विशेष विमानांची व्यवस्था केली असून, त्याद्वारे 184 प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. आज आणखी 232 प्रवाशांसाठी एक विशेष विमान रवाना होणार आहे.
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना काश्मीरला पाठवण्यात आले असून, मुख्यमंत्री यांनी थेट व्हिडिओ कॉलद्वारे रुग्णालयात दाखल झालेल्या पर्यटकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र सदन या त्रिस्तरीय यंत्रणेद्वारे राज्यातील पर्यटकांच्या मदतीसाठी सतत प्रयत्न सुरू आहेत.
काही प्रवाशांना जम्मूमधील कालिका धाम येथे निवासाची तर दिल्लीमध्ये आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. राज्य सरकारने आवश्यक असल्यास आणखी विशेष विमानांची तयारी ठेवली असून, पर्यटकांच्या सुरक्षित परतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App