या आरोपपत्रात 26 आरोपी आणि 3 फरार आरोपींची नावे आहेत
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Baba Siddiqui case बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने सोमवारी मकोका न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणी 4590 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रात 26 आरोपी आणि 3 फरार आरोपींची नावे आहेत, ज्यात शुभम लोणकर, झिशान अख्तर आणि अनमोल बिश्नोई यांचा समावेश आहे.Baba Siddiqui case
बाबा सिद्दीकी खून प्रकरणातील पोलिस तपासानुसार हत्येमागे तीन प्रमुख कारणे आहेत. पहिले म्हणजे, सलमान खानच्या जवळ असणे, अनुज थप्पनच्या आत्महत्येचा बदला घेणे किंवा बिश्नोई टोळीचे वर्चस्व प्रस्थापित करणे आणि आपली भीती वाढवणे. खुनाची ही तीन कारणे सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी शुभम लोणकरच्या फेसबुक पोस्टचा आधार घेतला आहे. एवढेच नाही तर आरोपपत्रात 210 जणांचे जबाबही आहेत.
12 ऑक्टोबर 2024 रोजी बाबा सिद्दीकी यांची त्यांच्या मुलाच्या कार्यालयातून बाहेर पडताना हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी सांगितले होते की, 66 वर्षीय सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी रात्री 9:11 वाजता मुंबईतील वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्याच्या छातीवर दोन गोळ्या लागल्या आणित्याला लीलावती रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App