“आम आदमी” केजरीवालांच्या बंगल्याच्या नूतनीकरणावर 45 कोटींची उधळपट्टी; मार्बल वर 3 कोटी, तर पडद्यांवर 97 लाख खर्च

प्रतिनिधी

नवी दिल्ली : मी मुख्यमंत्री झालो, तर सुरक्षा घेणार नाही. सरकारी बंगला वापरणार नाही. लाल दिव्याची सरकारी कार वापरणार नाही. दिल्लीतले व्हीआयपी कल्चर संपवून टाकीन, वगैरे बाता मारणारे दिल्लीतले आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे “सर्वसामान्य जीवन” आता उघड्यावर आले आहे. 45 crore extravagance on renovation of Kejriwal’s bungalow

सर्वसामान्य माणसाला घराचा रंग देणे परवडत नाही. पण या आम आदमी पार्टीच्या मुख्यमंत्र्याने आपल्या सरकारी घराच्या नूतनीकरणावर तब्बल 45 कोटी रुपये खर्च केल्याचे उघड झाले आहे. घराचे पडदेच 97 लाख रुपयाचे असून तीन कोटी रुपयांचा मार्बल घराला बसवला आहे. खर्चाचा नेमका आकडाच द्यायचा झाला तर दिल्लीच्या करदात्यांचे 44.78 कोटी रुपये केजरीवालांनी सरकारी बंगल्याच्या नूतनीकरणावर उधळले आहेत.

टाइम्स नाऊ नवभारत टाइम्सने ही बातमी दिली आहे. केजरीवालांच्या सरकारी बंगल्याचे पडदे भारतीय नाहीत, तर बंगल्यासाठी मार्बल आणि 23 पडद्यांचे ऑर्डर थेट व्हिएतनामला दिली गेली आणि त्याचे 97 लाखांचे बिल अदा केले गेले. बंगल्याच्या मार्बलवर 3 कोटी रुपये, तर मार्बल व्यवस्थित बसवण्यासाठी लागणाऱ्या केमिकल वर 21,60,000 रुपये खर्च केले.

अरविंद केजरीवालांचा हा शीश महाल तिच्या सिविल लाईन्स मध्ये स्थित आहे. बंगल्यासाठी सुरवातीला 23 पडदे ऑर्डर केले. त्यापैकी 45 लाख रूपयांचे 8 पडदे पहिल्यांदा लावले. दुसऱ्या फेजमध्ये 51 लाखांचे 15 पडदे लावले. मार्बल पण विएतनाम मधूनच मागविला. हा 3 कोटी रुपयांचा ‘डियोर पर्ल मार्बल’ आहे. त्याच्या केमिकल वर 21,60,000 रुपये खर्च केले.

बंगल्याच्या बाकीच्या इंटिरिअरवर 11 कोटी रूपये खर्च झाले. यात 2.5 कोटी रूपये लाईट, पंखे, जनरेटर वर खर्च केले. 1.4 कोटींचे Wardrobe बनविले. 40 लाख रूपयांची कपाटे घेतली. 2.85 कोटींची Fire Fighting system बसविली.

45 crore extravagance on renovation of Kejriwal’s bungalow

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात