विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात वाढत असलेल्या वायूप्रदूषणाची मोठी किंमत आरोग्याच्या पातळीवर चुकवावी लागणार आहे. वाढत्या वायू प्रदूषणामुळे देशातील ४० टक्के नागरिकांचे आयुर्मान नऊ वर्षांपेक्षा कमी होण्याची भीती अमेरिकन संशोधन गटाने व्यक्त केली आहे.40% of Indians fear that life expectancy will be reduced by nine years due to air pollution
शिकागो विद्यापीठातील ऊर्जा धोरण संस्थेने (ईपीआयसी) तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे की, राजधानी नवी दिल्लीसह मध्य, पूर्व आणि उत्तर भारताच्या विस्तृत भागांमध्ये राहणार ४८ कोटींहनू अधिक नागरिकांना वायूप्रदूषणाचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. केवळ ऐवढेच नव्हे तर वायू प्रदूषित भागात सातत्याने वाढ होत आहे.
आत्तापर्यंत उत्तर भारतामध्येच वायू प्रदूषण जास्त होते. परंतु, आता पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातही हवेची गुणवत्ता खराब होत आहे.धोकादायक प्रदूषणाच्या पातळीवर लगाम घालण्यासाठी 2019 मध्ये सुरू करण्यात आलेल्या भारताच्या राष्ट्रीय स्वच्छ वायु कार्यक्रमाचे कौतुक करताना या अहवालात म्हटले आहे की हे ध्येय साध्य झाले तर देशातील नागरिकांचे आयुर्मान सरासरी १.७ वर्षांनी तर दिल्लीत राहणाºया नागरिकांचे आयुर्मान ३.१ वर्षांनी वाढण्याची आशा आहे.
स्वच्छ वायू कार्यक्रमाअंतर्गत २०२४ पर्यंत वायू प्रदूषणामुळे सर्वात जास्त प्रभावित १०२ शहरांमधील प्रदूषण २० ते ३० टक्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले आहे. यासाठी औद्योगिक उत्सर्जन आणि वाहनांच्या एक्झॉस्टमध्ये कपात, वाहतूक इंधन आणि बायोमास जाळण्यासाठी कडक नियम लागू करणे आणि धूळ प्रदूषण कमी करणे हे आहे.
गेल्या वर्षी, नवी दिल्लीतील दोन कोटी लोकांनी कोरोना महामारीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे स्वच्छ हवेचा अनुभव घेतला होता. मात्र, हिवाळ्यात शेजारील पंजाब आणि हरियाणा या राज्यातील शेतांतील अवशेष जाळल्याने झालेला धूर राजधानीत आल्याने विषारी हवेचा सामना करावा लागला होता.भारताचा शेजारी देश असलेल्या बांग्ला देशातही जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निकषांप्रमाणे काम कले तर आयुर्मान सरासरी ५.४ वर्षंनी वाढू शकते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App