कामगारांसाठी 4 नवीन कायदे लागू; “असे” झाले बदल, “या” मिळणार सुविधा!!

workers

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : वेतन संहिता २०१९, औद्योगिक संबंध संहिता २०२०, सामाजिक सुरक्षा संहिता २०२०, आणि ऑक्युपेशनल सुरक्षितता, आरोग्य आणि वर्किंग कंडीशन्स संहिता २०२० हे नवीन कायदे कामगारांच्या हिताचं रक्षण करुन त्यांच्याविषयीचा आदर वाढवतील. जुन्या कायद्यांमधल्या तरतुदी कालबाह्य झाल्या असून, नवीन कायद्यांमुळे कामगारांना सरस वेतन, विमा सुरक्षा आणि इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल, असे केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी जाहीर केले.4 new laws implemented for workers; “These” changes have been made, “These” facilities will be available!!

या कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे वेळेवर किमान वेतन, नियुक्तीपत्र, महिलांना समान वेतन, ४० कोटी कामगारांना विमा संरक्षण, तसंच निश्चित कालावधीसाठी कामावर ठेवलेल्यांना वर्षभरानंतर ग्रॅच्युईटीचा लाभ मिळेल. ४० वर्षापेक्षा जास्त वयाच्या कामगारांना वार्षिक आरोग्य तपासण्या मोफत करता येतील. ओव्हटाईमसाठी दुप्पट वेतन तसंच धोकादायक परिस्थितीत काम करणाऱ्या कामगारांना आरोग्य विमा मिळण्याची तरतूद या कायद्यांमधे आहे.



– कामगारांना मिळणारे मुख्य फायदे

1. वेतनाची संहिता (Code on Wages, 2019)
– समान किमान वेतन: संपूर्ण देशासाठी किमान वेतनाची एकसमान पातळी निश्चित केली जाईल. यामुळे देशातील सर्व कामगारांना किमान वेतन मिळेल, जे राज्यांच्या किमान वेतनापेक्षा कमी नसेल.

– वेळेवर पगार: वेतन आणि अंतिम सेटलमेंट वेळेवर करण्याची तरतूद आहे. नोकरी सोडल्यानंतर किंवा काढल्यानंतर दोन दिवसांच्या आत पूर्ण व वेळेवर वेतन मिळेल.

2. सामाजिक सुरक्षा संहिता (Code on Social Security, 2020)

– सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा: पहिल्यांदाच, गिग वर्कर्स आणि प्लॅटफॉर्म वर्कर्स यांना देखील सामाजिक सुरक्षा योजनेच्या कक्षेत आणले जाईल.

– ईएसआयसी आणि ईपीएफओ कव्हरेज: सामाजिक सुरक्षा कव्हरेजचा विस्तार करून ते अधिक कामगारांपर्यंत पोहोचवले जाईल.

3. औद्योगिक संबंध संहिता (Industrial Relations Code, 2020)

– फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट : कंपन्या आता कोणत्याही कामगाराला ठराविक कालावधीसाठी नोकरीवर ठेवू शकतील. या “फिक्स्ड टर्म” कामगारांना नियमित कामगारांसारखेच वेतन आणि सामाजिक सुरक्षा लाभ मिळतील.

4. व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या स्थितीची संहिता (2020)

– कामाचे तास: आठवड्यातील कामाचे कमाल तास निश्चित केले जातील (सामान्यतः ४८ तास). मात्र, काही प्रकरणांमध्ये कामाचे दिवस ५ वरून ४ पर्यंत कमी करण्याचा पर्याय दिला गेला आहे, परंतु त्यासाठी कामाचे तास वाढवावे लागतील आणि आठवड्यात ३ सुट्ट्या मिळतील.

– महिलांसाठी सुरक्षा: महिलांना त्यांच्या संमतीने रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याची मुभा मिळेल, पण त्यासाठी त्यांच्या सुरक्षिततेची पुरेशी व्यवस्था कंपनीला करावी लागेल.

या नवीन संहितांचे मुख्य उद्देश देशातील कामगार कायद्यांना सोपे करणे, कामगारांचे हक्क आणि सुरक्षा सुनिश्चित करणे आणि देशात उद्योगांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे, हे आहेत.

4 new laws implemented for workers; “These” changes have been made, “These” facilities will be available!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात