वृत्तसंस्था
मुंबई : तब्बल 13500 कोटींचा घोटाळा करून आणि कर्ज बुडवून परदेशात पळालेला उद्योगपती नीरव मोदी याच्या 39 मालमत्ता जप्त करण्यास न्यायालयाने मान्यता दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे नीरव मोदीचे मुंबईत काळाघोडा येथील रिदम हाऊस, अलिबामधील बंगला आणि 22 महागड्या कार जप्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ईडीने नीरव मोदी याच्या 929 कोटींच्या 48 मालमत्ता जप्त करण्याच्या परवानगीसाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. त्यापैकी 39 मालमत्ता जप्त करण्यास न्यायालयाने मान्यता दिली आहे. 39 properties of Nirav Modi to be seized; Including ‘these’ properties
पंजाब नॅशनल बॅंकेत 13 हजार 500 कोटी रुपयांचा घोटाळा नीरव मोदीने केला आहे. कर्ज बुडवून देशाबाहेर पळालेल्या नीरव मोदीच्या हस्तांतरणाच्या प्रक्रियेवर सध्या लंडनच्या न्यायालयात खटला सुरु आहे.
नीरव मोदी ब्रिटनच्या तुरुंगात बंद
नीरव मोदी सध्या ब्रिटनच्या तुरुंगात बंद आहे. नीरव मोदीने त्याचा काका मेहुल चोक्सी याच्यासोबत मिळून पंजाब नॅशनल बॅंकेत हेराफेरी केली होती. नीरव मोदी गीतांजली या ब्रॅंड नावाने हि-याचा व्यवसाय करत आहे. नीरव मोदीशिवाय मद्य व्यवसायिक विजय मल्या, आयपीएलचे संस्थापक ललित मोदी हेही यावेळी ब्रिटनमध्ये आहेत. भारत सरकारने यांना फरार जाहीर केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App