वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दररोज कितीही केंद्रातल्या भाजप सरकारवर शरसंधान साधत असल्या तरी प्रत्यक्ष त्यांच्या पश्चिम बंगाल राज्यातले तृळमूळ काँग्रेसचे 38 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा करून भाजपचे नेते मिथुन चक्रवर्ती यांनी देशातल्या राजकारणात नवी खळबळ उडवून दिली आहे. 38 MLAs of Mamata’s Trinamool in West Bengal in touch with BJP; Mithun Chakraborty’s claim stirs up excitement
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या समावेत 39 आमदारांनी बंड करून शिवसेना फोडली. उद्धव ठाकरे यांचे सरकार घालवले. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये 38 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगून मिथुन चक्रवर्ती यांनी तशीच राजकीय खळबळ उडवून दिली आहे. यातल्या 38 आकड्याला महत्त्व आहे.
#WATCH क्या आप ब्रेकिंग न्यूज सुनना चाहते हैं? इस समय 38 TMC विधायकों के हमारे साथ बहुत अच्छे संबंध हैं, जिनमें से 21 सीधे (हमारे संपर्क में) हैं: भाजपा नेता मिथुन चक्रवर्ती, कोलकाता, पश्चिम बंगाल pic.twitter.com/iJJrPwqNTP — ANI_HindiNews (@AHindinews) July 27, 2022
#WATCH क्या आप ब्रेकिंग न्यूज सुनना चाहते हैं? इस समय 38 TMC विधायकों के हमारे साथ बहुत अच्छे संबंध हैं, जिनमें से 21 सीधे (हमारे संपर्क में) हैं: भाजपा नेता मिथुन चक्रवर्ती, कोलकाता, पश्चिम बंगाल pic.twitter.com/iJJrPwqNTP
— ANI_HindiNews (@AHindinews) July 27, 2022
पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणुकीत मिथुन चक्रवर्ती हे भाजपचे स्टार प्रचारक होते. संपूर्णपणे त्यांच्या नेतृत्वाखाली जरी निवडणूक लढवली गेली नसली तरी जर पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार आले असते तर मुख्यमंत्री पदासाठी त्यांचेच नाव प्रामुख्याने घेतले जात होते. परंतु पश्चिम बंगालमध्ये भाजपला 77 जागांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर काही काळ मिथुन चक्रवर्ती राजकीय अज्ञातवासात गेले होते. परंतु, आता परत एकदा ते पश्चिम बंगालच्या राजकारणात परतले असून भाजपच्या आमदारांची त्यांनी एक बैठक घेतली. या बैठकीनंतरच त्यांनी तृणामूळ काँग्रेसचे 38 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा खळबळ जनक दावा केला. या 38 पैकी 21 आमदार तर प्रत्यक्ष आपल्या संपर्कात असल्याचाही दावा त्यांनी करून ममता बॅनर्जी सरकारमध्ये राजकीय खळबळ उडवून दिली आहे.
– मोदींच्या पराभवाचा ममतांचा दावा
2024 च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रातल्या मोदी सरकारचा पराभव करण्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर खुद्द त्यांच्या राज्यात आणि त्यांच्याच पक्षात तृणमूळ काँग्रेस पक्षात सर्व काही आलबेल नाही हे मिथुन चक्रवर्ती यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App