सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्करी गट यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धात जवळपास ४०० जणांचा मृत्यू झालेला आहे.
विशेष प्रतिनिधी
सुदानमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन कावेरी अंतर्गत भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याचे काम जोरात सुरू आहे. बुधवारी जेद्दाह विमानतळावरून 360 भारतीय नागरिकांचा एक गट नवी दिल्लीला रवाना झाला. 360 Indian nationals leave from Jeddah Airport on a flight bound for New Delhi
भारताने आपल्या तीन हजार भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन कावेरी सुरू केले आहे. याला अंमलात आणण्यासाठी दुसरे नौदलाचे जहाज आयएनएस तेगही सुदानच्या किनारपट्टीवर पोहोचले आहे. याशिवाय, सुदानमध्ये ७२ तासांच्या युद्धविराम दरम्यान तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना आवश्यक मदत सामग्री देखील पुरविण्यात आली.
ऑपरेशन कावेरी –
तत्पूर्वी, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी एका ट्विटमध्ये सांगितले की, ऑपरेशन कावेरी अंतर्गत सुदानमध्ये अडकलेल्या २७८ भारतीयांची पहिली तुकडी INS सुमेधा येथून जेद्दाहला रवाना झाली. जेद्दाहहून भारतीय नागरिकांना भारतीय हवाई दलाच्या विमानाने देशात आणले जाईल. ते म्हणाले की ऑपरेशन कावेरी अंतर्गत अधिकाऱ्यांसह आयएनएस तेग भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आवश्यक मदत सामग्रीसह सुदान किनारपट्टीवरील दूतावास कॅम्प ऑफिसमध्ये पोहोचले आहे.
सध्याची परिस्थिती –
दुसरीकडे परराष्ट्र राज्यमंत्री मुरलीधरनही तेथे पोहोचले आहेत. ते म्हणाले की, भारतीयांना बाहेर काढण्यासाठी सुदान आणि जेद्दाहमध्ये आवश्यक तयारी करण्यात आली आहे. जेद्दाहला पोहोचल्यावर त्यांनी येथे उभारलेल्या नियंत्रण कक्षाला भेट दिली.
#WATCH | 360 Indian nationals leave from Jeddah Airport on a flight bound for New Delhi. They have been evacuated from the conflict-torn Sudan. #OperationKaveri (Video: MoS MEA V. Muraleedharan) pic.twitter.com/qzp2E0VHQY — ANI (@ANI) April 26, 2023
#WATCH | 360 Indian nationals leave from Jeddah Airport on a flight bound for New Delhi. They have been evacuated from the conflict-torn Sudan. #OperationKaveri
(Video: MoS MEA V. Muraleedharan) pic.twitter.com/qzp2E0VHQY
— ANI (@ANI) April 26, 2023
सुदानमध्ये गेल्या १२ दिवसांपासून लष्कर आणि निमलष्करी गट यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धात ४०० जणांचा मृत्यू झाला आहे. सुदानमधून भारतीयांना बाहेर काढण्याच्या भारताच्या प्रयत्नांमुळे लष्कर आणि निमलष्करी रॅपिड सपोर्ट फोर्स (RSF) यांच्यात ७२ तासांच्या युद्धविरामावर सहमती झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App