वृत्तसंस्था
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये ( Pakistan ) रविवारी (25 ऑगस्ट) दोन वेगवेगळ्या बस अपघातात 36 जणांचा मृत्यू झाला. दोन्ही अपघातात 36 जण जखमी झाले आहेत.
पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिलेल्या माहितीनुसार, कहुताहून रावळपिंडीला जाणारी बस ब्रेक फेल झाल्याने खड्ड्यात पडली. या बसमध्ये 26 प्रवासी होते, त्यापैकी 25 जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील कहूटा आझाद पट्टण रोडवरील गिरारी पुलावर हा अपघात झाला.
दुसरा अपघात बलुचिस्तानमधील मकरन हायवेवरील बुज्जी टॉपजवळ झाला. येथे भरधाव वेगाने जात असलेली बस उलटली. या अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 35 जण जखमी झाले आहेत. बसमध्ये 60 प्रवासी होते, त्यापैकी 4 प्रवासी अजूनही अडकले आहेत. पोलिस क्रेनच्या साहाय्याने अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
ही बस इराणहून यात्रेकरूंना घेऊन येत होती
बलुचिस्तानमध्ये भरधाव वेगाने उलटलेली बस इराणहून यात्रेकरूंना घेऊन जात होती. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुज्जी टॉपजवळ अतिवेगाने बस चालकाच्या नियंत्रणाबाहेर जाऊन उलटली.
अपघातात जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये अजूनही 4 प्रवासी अडकले असून, क्रेनच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. बसमध्ये प्रवास करणारे प्रवासी हे लाहोर आणि गुजरांवाला येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.
इराणमधील गाबाद ते ग्वादार प्रवासावर बंदी
या दुर्घटनेनंतर ग्वादर जिल्हा प्रशासनाने यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी इराणमधील गबड्डी ते ग्वादर यात्रेवर बंदी घातली आहे. जिल्हा दंडाधिकारी हमुदुर रहमान म्हणाले, “इराणने यात्रेकरूंच्या प्रवेशावर बंदी घातली आहे, त्यामुळे त्यांनी यावेळी कोणताही प्रवास टाळावा.”
यात्रेकरूंच्या प्रवास सुविधा सुधारण्यासाठी हे निर्बंध घालण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App