वृत्तसंस्था
काबूल : अफगाणिस्तानातील पंजशीरचा भाग जिंकण्यासाठी तालिबान आणि नॉर्दन अलायन्स यांच्यात जोरदार युद्ध सुरु झाले आहे. या युद्धादरम्यान ३५० हून अधिक तालिबानचे दहशतवादी मारले गेल्याचा दावा नॉर्दन अलायन्सने केला आहे. 350 Talibani killed by norden alliance attack
नॉर्दन अलायन्सने या युद्धात ३५० हून अधिक तालिबानी दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा केला. मात्र त्यास दुजोरा मिळू शकला नाही. यावेळी मोठ्या प्रमाणात अमेरिकी शस्त्रे आणि गाड्या जप्त केल्या आहेत. ४० हून अधिक तालिबानी दहशतवाद्यांना ओलिस ठेवल्याचे नॉदर्न अलायन्सने म्हटले आहे. नॉदर्न अलायन्सच्या बंडखोरांनी सोमवारी रात्री देखील तालिबानच्या दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा केला. या चकमकीत सात दहशतवादी मारले गेले तसेच अलायन्स दोघे जखमी झाले आहेत. पंजशीरच्या बंडखोरांनी यापूर्वीही शंभरपेक्षा अधिक तालिबान्यांना ठार केल्याचे म्हटले आहे.
परवान प्रांतात जबाल सराज जिल्हा, बगलान प्रांतात अंदराब जिल्हा आणि खवाक पंजशीर येथेही संघर्ष झाला आहे. तालिबानकडून पंजशीर खोऱ्यात घुसण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. परंतु बंडखोरांकडून त्यांचा कडवा प्रतिकार केला जात आहे. काल रात्री ११ च्या सुमारास पंजशीरचे मुख असलेले गोलबहार भागात युद्ध झाले. अहमद मसूद याच्या नेतृत्वाखाली नॉर्दन अलायन्स तालिबानचा मुकाबला करत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App