leader Bajwas : ‘आम आदमी पार्टीचे ३२ आमदार संपर्कात आहेत’, पंजाब काँग्रेस नेते बाजवा यांचा मोठा दावा!

leader Bajwas

सतत खोटं बोलून हे सरकार पंजाबच्या लोकांच्या नजेरूतून उतरले आहे, असंही बाजवा म्हणाले आहेत.


विशेष प्रतिनिधी

चंदीगड. leader Bajwas पंजाब विधानसभेचे अधिवेशन आता लवकरच सुरू होणार आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षनेते प्रताप सिंह बाजवा यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना सांगितले की, आम आदमी पक्षाचे ३२ आमदार त्यांच्या संपर्कात आहेत.leader Bajwas

मात्र , त्यांचा हेतू सरकार तोडण्याचा नाही. ते म्हणाले की, सतत खोटे बोलून हे सरकार पंजाबच्या लोकांच्या नजरेत आधीच पडले आहे. तर डिसेंबरमध्ये विधानसभा अधिवेशन न बोलावल्याबद्दल बाजवा यांनी सत्ताधारी पक्षावरही जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, आता जेव्हा अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलावायला हवे होते, तेव्हा सरकार आजचे अधिवेशन बोलावून केवळ औपचारिकता पूर्ण करत आहे. याचबरोबर सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे, असेही ते म्हणाले. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आधीच ढासळली होती आणि आता आर्थिक व्यवस्था आणखी बिघडली आहे. असंही त्यांनी सांगितले.

याशिवाय भारतीय जनता पक्षाचे नेते अश्विनी शर्मा यांनीही सरकारवर मुद्द्यांपासून पळ काढत असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, आम आदमी पक्ष सत्तेत असताना मागील सरकारच्या काळात ते विधानसभेचे जास्त काळ अधिवेशन बोलावण्याची मागणी करत होते, परंतु आता ते स्वतः सत्तेत असताना विधानसभेचे अधिवेशन बोलावण्यास घाबरत आहेत. सरकार लोकांच्या प्रश्नांवर अर्थपूर्ण चर्चा टाळत आहे.

32 Aam Aadmi Party MLAs are in touch Punjab Congress leader Bajwas big claim

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात