वृत्तसंस्था
सेऊल : उत्तर कोरियामध्ये किम जोंग उनच्या हुकूमशाही सरकारने 30 अल्पवयीन विद्यार्थ्यांना जाहीरपणे गोळ्या घातल्या. या विद्यार्थ्यांवर दक्षिण कोरियामध्ये बनवलेल्या मालिका पाहण्याचा आरोप होता, ज्यांना कोरियन ड्रामा किंवा के-ड्रामा म्हणतात. कोरियन वृत्तपत्र ‘जोंगआंग डेली’च्या मते, ही घटना गेल्या आठवड्यात घडली होती, ज्याचा तपशील आता समोर आला आहे. 30 students killed in North Korea for watching K-drama; The dictator shot in front of everyone
दक्षिण कोरियाच्या स्थानिक टीव्ही चॅनल ‘चोसून’च्या वृत्तानुसार, विद्यार्थ्यांनी पेन ड्राईव्हमध्ये साठवून ठेवलेली अनेक दक्षिण कोरियाई मालिका पाहिल्या होत्या. हे पेन ड्राईव्ह गेल्या महिन्यात सेऊलमधून फुग्यांद्वारे उत्तर कोरियाला पाठवण्यात आले होते.
‘जपानी, कोरियन आणि अमेरिकन मालिकांवर बंदी’
उत्तर कोरियामध्ये जपानी, कोरियन आणि अमेरिकन नाटकांवर बंदी आहे. फक्त रशियन सिनेमा किंवा सरकार योग्य मानते तोच सिनेमा तिथे दाखवला जातो.
डिसेंबर 2020 मध्ये अंमलात आलेल्या उत्तर कोरियाच्या प्रतिक्रियावादी विचारसरणी आणि संस्कृती नकार कायद्यांतर्गत, दक्षिण कोरियातील मीडिया प्रसारित करणाऱ्यांना मृत्यूदंड आणि ते पाहणाऱ्यांना 15 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे.
या कायद्यांतर्गत पुस्तके, गाणी, छायाचित्रे यांचाही समावेश करण्यात आला आहे. या नियमानुसार, दक्षिण कोरियन भाषा आणि गाण्याची शैली वापरल्यास दोन वर्षे सक्तमजुरी होऊ शकते.
गेल्या महिन्यात 17 वर्षाखालील सुमारे 30 अल्पवयीन मुलांना जन्मठेप आणि फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, या वर्षी जानेवारीमध्ये दोन अल्पवयीन मुलांकडे कोरियन व्हिडिओ सापडले होते, त्यानंतर त्यांना 12 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
70 कोरियन गाणी सापडल्यानंतर मुलाला बेदम मारहाण
या वर्षी, 22 वर्षांच्या मुलाच्या ताब्यात 70 हून अधिक कोरियन गाणी सापडली, त्यानंतर त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. पण तो पळून गेला. दुस-याच दिवशी त्याचा मृतदेह त्याच्या घरात आढळून आला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App