एका लोकसभा क्षेत्रात ५ हजार मुस्लीम मोदी मित्र असतील, जे प्राचार्य, डॉक्टर, इंजिनिअर, वकील यासरखे गैरराजकीय व्यक्ती असतील.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भाजपाने मुस्लीम समाजातील मागास आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांवर लक्ष केंद्रित करणे सुरू केले आहे. भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्राच्या मुस्लीम कल्याणकारी योजनांचा प्रचार करण्यासाठी ३ लाख २५ हजार मुस्लीम ‘मोदी मित्र’ देशभरातील ६५ मुस्लीम बहुल लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान मोदींसोबत प्रचार करतील. भाजपा मुस्लीम मोर्चाचे अशरफ ते पसमांदापर्यंत (उच्चभ्रू ते दुर्बल वर्गापर्यंत) पोहचण्याचे देशव्यापी अभियान १० मे पासून सुरू होत आहे. 3 lakh 25 Modi friends will campaign for BJP in 65 Muslim majority constituencies across the country
सिद्दीकीने म्हटले की, अभियानांतर्गत सांगितले जाईल की भाजपा सरकारच्या सर्व योजनांचा लाभ भेदभाव न होता मुस्लिमांना मिळत आहे. एका लोकसभा क्षेत्रात ५ हजार मुस्लीम मोदी मित्र असतील. हे प्राचार्य, डॉक्टर, इंजिनिअर, वकील यासरखे गैरराजकीय व्यक्ती असतील.
प्रचारासाठी निवडण्यात आलेल्या क्षेत्रांमध्ये ३० टक्क्यांहून अधिक मुस्लीम मतदार आहेत. यामध्ये उत्तरप्रदेश-बंगालचे १३-१३, केरळचे – ८, आसामचे सहा, जम्मू-काश्मीर-५, बिहार-४, मध्यप्रदेश -३, महाराष्ट्र, दिल्ली, गोवा, तेलंगणा, हरियाणाचे प्रत्येकी २-२, लडाख, लक्षद्वीप, तामिळनाडूच्या प्रत्येकी एक-एक लोकसभा क्षेत्राचा समावेश आहे.
देशाच्या लोकसंख्येमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या सुमारे १४ टक्के आहे. यापैकी ८० टक्के पसमांदा मुस्लीम आहेत. यामध्ये दलित आणि मागासवर्गीय मुस्लीम येतात. ते सामाजिक-आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत. हा शब्द मूळ फारसी आहे, ज्याचा अर्थ समाजात मागे राहिलेले लोक असा होतो. भारतातील मागासलेल्या आणि दलित मुस्लिमांना पसमांदा म्हणतात. भारतातील पसमांदा चळवळ १०० वर्षे जुनी आहे. गेल्या शतकाच्या दुसऱ्या दशकात मुस्लीम पसमंदा चळवळ उभी राहिली.
भारतीय मुस्लीम जातीच्या तीन गटात विभागले गेले आहेत. जी हिंदूंच्या चार वर्णांच्या रचनेसारखी आहे. माजी राज्यसभा सदस्य आणि पसमंदा मुस्लिम चळवळीचे नेते अली अन्वर अन्सारी यांच्या मते, पहिल्या वर्गात सय्यद, शेख, पठाण, मिर्झा, मुघल या उच्च जातींचा समावेश होतो. दुसऱ्या वर्गात तथाकथित मध्यम जातींचा समावेश होतो. त्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यामध्ये अनेक जाती आहेत. जसे अन्सारी, मन्सूरी, वर्षा, कुरेशी. तर हलालखोर, हवारी, रज्जाक इत्यादी जाती तिसऱ्या वर्गात येतात.
१७ जानेवारी २०२३ रोजी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, आम्हाला सरकारची धोरणे मुस्लीम समाजातील बोहरा, पसमांदा आणि शिक्षित लोकांपर्यंत पोहोचवायची आहेत. आम्हाला समाजातील सर्व घटकांशी जुडायचे आहे आणि त्यांना आपल्याशी जोडायचे आहे. याच्या जवळपास सहा महिन्यांपूर्वी ३ जुलै २०२२ रोजी हैदराबादमध्ये झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी पसमांदा मुस्लिमांसाठी स्नेह यात्रेची घोषणा केली होती. पसमांदा मुस्लिमांच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचून त्यांना भाजपशी जोडण्यासाठी पुढाकार घेणे हा या यात्रेचा उद्देश होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App