विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. त्यानुसार 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार असून 14 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. बिहार विधानसभेची निवडणूक प्रक्रिया 16 नोव्हेंबर पर्यंत संपुष्टात आणणार आहे.Bihar Assembly elections
बिहार विधानसभेची मुदत 22 नोव्हेंबर 2025 रोजी संपत असून तिच्या आत निवडणूक घेणे निवडणूक आयोगाला भाग होते त्यानुसार निवडणूक आयोगाने आज बिहार विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. वर उल्लेख केल्याप्रमाणे 6 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान होणार असून 11 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. दोन्ही टप्प्यातली मतमोजणी एकाच दिवशी 14 नोव्हेंबरला होणार असून त्याच दिवशी निकाल लागून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 16 नोव्हेंबर पर्यंत संपविणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी जाहीर केले.Bihar Assembly elections
अनेक नवे उपक्रम
बिहार विधानसभा निवडणुकीचे अनेक तपशील त्यांनी जाहीर केले असून त्यामध्ये व्हीव्हीपॅट मतमोजणीचाही समावेश आहे. त्याचबरोबर मतदार ओळखपत्रावर आणि मतदान यंत्रावर मतदारांचे आणि उमेदवारांचे रंगीत फोटो असणार आहेत. राहुल गांधींनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने कायद्याच्या कक्षेत येणाऱ्या सर्व सुधारणा केल्या असून त्यांची पहिली अंमलबजावणी बिहार विधानसभा निवडणुकीत होणार आहे.
Bihar Election to take place in two phases on 6th and 11th November. Counting to take place on 14th November. pic.twitter.com/KZCt6dNGRV — ANI (@ANI) October 6, 2025
Bihar Election to take place in two phases on 6th and 11th November. Counting to take place on 14th November. pic.twitter.com/KZCt6dNGRV
— ANI (@ANI) October 6, 2025
भाजप आणि जदयू यांची युती आणि काँग्रेस राजद यांची महाआघाडी यांच्यात जबरदस्त टक्कर होणे अपेक्षित आहे. राहुल गांधींनी सुरुवातीपासून या निवडणुकीत लक्ष घातले आहे, पण बिहार विधानसभा निवडणूक जाहीर झाली त्या दिवशी राहुल गांधी मात्र दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App