कर्नाटक निवडणुकीत 2,613 उमेदवार आजमावणार नशीब, बंडखोर पक्षांसाठी ठरले डोकेदुखी

प्रतिनिधी

बंगळुरू : कर्नाटकात 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सोमवारी संपली. त्यानंतर आता एकूण 2,613 उमेदवार रिंगणात आहेत. सोमवारपर्यंत एकूण 517 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. रिंगणात असलेल्या 2,613 उमेदवारांपैकी 2,427 पुरुष, 184 महिला आणि 2 इतर उमेदवार आहेत, असे कर्नाटक मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितले.2,613 candidates will try their luck in the Karnataka elections, a headache for the rebel parties

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांकडून निवडणूक लढवणारे उमेदवार- 224 भाजपा, 223 INC (मेलुकोटमध्ये सर्वोदय कर्नाटक पक्षाचा पाठिंबा), 207 JD(S), 209 AAP, 133 BSP, 4 CPI(M), 8 JD(U) आणि 2 NPP कडून आहे. तर 685 नोंदणीकृत अपरिचित राजकीय पक्षांचे (RUPP) आणि 918 अपक्ष आहेत. 16 मतदारसंघात 15 पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात आहेत, त्यामुळे मतदानादरम्यान या भागात दोन बॅलेट युनिट (BU) वापरल्या जातील.



बंडखोर उमेदवारांनीही अर्ज मागे घ्यावेत, यासाठी राजकीय पक्षांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. काही ठिकाणी अशा उमेदवारांना माघार घेण्यास राजी करण्यात पक्षांना यश आले. इतर पक्षांच्या तुलनेत भाजप आणि काँग्रेसच्या बाबतीत बंडखोर उमेदवारांची अडचण अधिक दिसून येते. 224 सदस्यीय विधानसभेसाठी 10 मे रोजी निवडणूक होणार असून 13 मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

2,613 candidates will try their luck in the Karnataka elections, a headache for the rebel parties

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात