विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चौबे चले छब्बे बनने, दुबे बनके लौटे!!, अशी हिंदीत कहावत आहे. तशीच अवस्था आता मोदीविरोधकांच्या “इंडिया” आघाडीची झाली आहे. इंडिया आघाडीची 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर 2023 रोजी मुंबईत बैठक होणार आहे. पण त्यापूर्वीच 26 पक्षांची आघाडी, जी 30 पक्षांची व्हायला निघाली होती, ती 24 पक्षांची बनून शिल्लक राहिली आहे!!26 parties I.N.D.I.A has reduced to 24 parties before Mumbai meeting on 31 August and 1 September 2023
आम आदमी पार्टीची फारकत
“इंडिया” आघाडीला मुंबईतल्या बैठकीपूर्वीच तडा गेला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने इंडिया आघाडीतून फारकत घेत राजस्थानात सर्वच्या सर्व म्हणजे 200 विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.
दिल्लीतील 6 लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवण्याची तयारी काँग्रेसने केल्याबरोबर आम आदमी पार्टीचे कान उभे राहिले आणि “इंडिया” आघाडीतून फारकत घ्यायला त्या पक्षाला निमित्त मिळाले. एक प्रकारे इंडिया आघाडीतून आम आदमी पार्टीची गच्छंती झाल्यातच जमा आहे.
काँग्रेसला ममतांच्या वाटाण्याच्या अक्षता
त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या हातात वाटाण्याच्या अक्षता देऊन आपली स्वतंत्र चूल मांडायचा प्रयत्न चालविला आहे. तृणमूल काँग्रेसचे वेगवेगळे खासदार ममता बॅनर्जी यांची पंतप्रधान पदाची उमेदवारी पुढे रेटण्यासाठी दररोज काही ना काहीतरी पिल्लू माध्यमांमध्ये सोडून देत आहेत. 3 वेळा मुख्यमंत्री, 2 वेळा केंद्रीय मंत्री 5 वेळा खासदार एवढे मोठे करिअर असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या खेरीज “इंडिया” आघाडीत दुसरा पंतप्रधान पदाचा उमेदवार असू शकत नाही, असा ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांचा होरा आहे.
ज्येष्ठतेच्या निकषावर शरद पवार, नितीश कुमार यांच्यापेक्षा ममता बॅनर्जी पिछाडीवर आहेत, हे ममतांचे समर्थक बिलकुल लक्षात घ्यायला तयार नाहीत. इथेच इंडिया आघाडीतल्या मतभेदांची मेख आहे.
पवारांचे कडे कडेने पोहणे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेमक्या राजकीय भूमिकेचा ठाव ठिकाण इंडिया आघाडीत कोणाला लागलेला नाही. ते महाराष्ट्रातल्या शिंदे – फडणवीस सरकारवर तोंडी तोफा डागत आहेत. त्यातही देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी पुन्हा एकदा टार्गेटवर घेतले आहे. पण अजित पवारांविरुद्ध मात्र ते बोलायला तयार नाहीत. अजित पवार यांच्या ऐवजी अजित समर्थकांच्या मतदारसंघांमध्ये मेळावे घेऊन राष्ट्रवादीतल्या संघर्षात ते उघडपणे कठोर भूमिका घेण्याऐवजी कडे कडेनेच पोहत आहेत. त्यामुळे पवारांच्या राजकीय विश्वासार्हतेबाबत “इंडिया” आघाडीतल्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या मनात दाट संशय आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत 31 ऑगस्ट आणि एक सप्टेंबर या दोन दिवसांमध्ये “इंडिया” आघाडीची बैठक होणार आहे. शरद पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटोले हे या बैठकीचे आयोजक आहेत.
“इंडिया” आघाडीच्या बंगलोरच्या बैठकीत 26 पक्षांचे नेते आले होते. त्यात भर घालून 30 पक्षांचे नेते मुंबईतल्या बैठकीला बोलवण्याचे शरद पवार म्हणाले होते. पण आता मुंबईच्या बैठकीपूर्वीच 26 पैकी 2 पक्ष गळण्याच्या बेतात आहेत. खुद्द शरद पवारांच्या पक्षाचे अजून तळ्यात मळ्यात आहे. त्यामुळे “चौबे चले छब्बे बनने, दुबे बनके लौटे” म्हणजेच 26 चे 30 करायला चालले, झाले 24!!, अशी “इंडिया” आघाडीची कढीपातळ अवस्था झाली आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App