वृत्तसंस्था
जिनेव्हा : कोरोना अजून संपलेला नाही, युराेप, मध्य आशियात आठ दिवसांत २४ हजार जणांचा बळी गेला आहे. कोरोना लाटेचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे भारतीयांनी सावध राहण्याची गरज आहे. 24,000 deaths in 8 days in Europe, Central Asia; Fear of another wave of corona
युराेप आणि मध्य आशिया खंडातील ५३ देशांमध्ये काेराेनाच्या नव्या लाटेची भीती जागतिक आराेग्य संघटनेने व्यक्त केली. या भागात गेल्या आठवडाभरात १८ लाख नवे रुग्ण आढळले असून, २४ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. हे आकडे वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात होत आहे.
जागतिक आराेग्य संघटनेच्या विभागीय कार्यालयाच्या प्रमुख डाॅ. हॅन्स क्लूज यांनी नव्या रुग्णांची संख्या पुन्हा रेकाॅर्ड पातळीवर पाेचत असल्यावरून गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या ५३ देशांमध्ये आणखी एक लाट येण्याची शक्यता आहे किंवा नव्या लाटेचा सामना करीत आहेत. संसर्ग पुन्हा वेगाने वाढू लागला आहे. युराेप पुन्हा एकदा महामारीच्या केंद्रस्थानी आला आहे.
गेल्या आठवड्यात ५३ देशांमध्ये काेराेनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण दुप्पटीने वाढले आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास फेब्रुवारीपर्यंत आणखी पाच लाख लाेकांचा महामारीमुळे मृत्यू हाेऊ शकताे, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App