कर्नाटकात मुसळधार पावसामुळे जीवित व वित्तहानी झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण २४ जणांना जीव गमवावा लागला आहे, तर ६५८ घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. याशिवाय पाच लाख हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान झाले असून १९१ जनावरांचाही मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) ही माहिती दिली आहे.24 people killed, 658 houses destroyed, more than 5 lakh hectares of crops destroyed due to rain in Karnataka
वृत्तसंस्था
बंगळुरू : कर्नाटकात मुसळधार पावसामुळे जीवित व वित्तहानी झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण २४ जणांना जीव गमवावा लागला आहे, तर ६५८ घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. याशिवाय पाच लाख हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान झाले असून १९१ जनावरांचाही मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने (सीएमओ) ही माहिती दिली आहे.
कर्नाटकातील पावसाच्या विध्वंसाची आकडेवारी
मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले की, “कर्नाटकमध्ये अतिवृष्टीमुळे एकूण 24 लोकांचा मृत्यू झाला आहे. पाच लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. 658 घरांचे पूर्ण नुकसान झाले आहे, तर 8495 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. किमान १९१ जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
याशिवाय कर्नाटक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनीही सांगितले की, या महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यभरात संततधार पावसामुळे एकूण २४ जणांचा मृत्यू झाला आहे. 1 नोव्हेंबरपासून आतापर्यंत 658 घरे पूर्णपणे आणि 8,495 घरांचे अंशत: नुकसान झाल्याचे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
रस्ते, शाळा, रुग्णालयांचेही नुकसान
प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी शेअर केलेल्या आकडेवारीवरून 2203 किमीचे रस्ते खराब झाल्याचेही समोर आले आहे. याशिवाय 1,225 शाळा, 39 प्राथमिक आरोग्य केंद्र, 1,674 विद्युत खांब आणि 278 विद्युत ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान झाले. अधिकृत आकडेवारीनुसार, 1 नोव्हेंबरपासून 27 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे, तर 21 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 200 टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App