वृत्तसंस्था
नवी दिल्ली : इंडिगो एअरलाइन्सने वाढत्या कोरोना संक्रमणामुळे २० टक्के विमानांची उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय आज घेतला आहे. 20% cancellation of flights by Indigo Airlines; due to the growing transition of Corona taken big decision
देशात ओमीक्रोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे इंडिगोने आपल्या विमान सेवा रद्द केल्या आहेत. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता २० % फ्लाइट रद्द करण्यात येत आहेत. जेव्हा एखादा प्रवासी एका फ्लाइटच्या बदल्यात वेगळ्या तारखेसाठी फ्लाइट घेतो, तेव्हा त्याला काही बदल शुल्क भरावे लागते.
इटलीतून आलेल्या १९० प्रवाशांना कोरोना, अमृतसर विमानतळावर गोंधळ; दुसरी धक्कादायक घटना
पण इंडिगो एअरलाइन्सने हे शुल्क ३१ जानेवारीपर्यंत माफ केले आहे. फ्लाइट रद्द झाल्यानंतर, ते इतर कोणत्याही फ्लाइटचे तिकीट बुक करतील की नाही हे प्रवाशांवर अवलंबून आहे. स्पाइसजेट एअरलाइन्सनेही अशीच काही सुविधा सुरू केली. कोरोनामुळे स्पाइसने नवा नियम जाहीर केला. त्यांनी ३१ जानेवारीपर्यंतचे बदल शुल्कही माफ केले.
इंडिगो एअरलाइन्सने म्हटले आहे की, सध्याच्या वेळापत्रकातील २० टक्के विमाने सेवेतून काढून टाकण्यात येत आहे. म्हणजेच, जेथे शक्य असेल तेथे, फ्लाइट रद्द केली जाईल आणि प्रवास सुरू होण्याच्या किमान ७२ तास आधी ग्राहकांना पुढील फ्लाइटमध्ये हलवले जाईल. प्लॅन बी अंतर्गत त्यांचा प्रवास देखील बदलता येतो. प्लॅन बीची माहिती इंडिगोच्या वेबसाइटवर दिली जाईल. फ्लाइट रद्द झाल्यास किंवा प्रवास बदलल्यास, कॉल सेंटरवर मोठ्या संख्येने कॉल येत आहेत, त्यामुळे लाइन व्यग्र आहे. हे टाळण्यासाठी इंडिगोने प्रवाशांना डिजिटल माध्यमातून माहिती घेण्याचा सल्ला दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App