दिव्यांगांच्या स्पेशल ऑलिंपिक मध्ये महाराष्ट्रातल्या 20 खेळाडूंना 50 पेक्षा जास्त पदके; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून खास अभिनंदन

विशेष प्रतिनिधी

मुंबई : स्पेशल ऑलिंपिक भारत नॅशनल चॅम्पियनशिप अ‍ॅथलेटिक्स, रोहतक, हरियाणा येथे फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाची घवघवीत कामगिरी केली. या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील 27 राज्यांमधील 510 दिव्यांग खेळाडूंनी सहभाग घेतला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ट्विट करून या संदर्भात माहिती दिली आणि सर्व खेळाडूंचे विशेष अभिनंदन केले.

महाराष्ट्र टीम – पदक तालिका

🥇 शितल परते

▪️200 मीटर – सुवर्ण
▪️400 मीटर – सुवर्ण
▪️4×100 मीटर रिले – सुवर्ण

🥇 दीपाली पवार

▪️स्पॉट जंप – सुवर्ण
▪️जॅव्हलिन थ्रो – सुवर्ण

🥇 भूमी भानुशाली

▪️शॉटपुट – सुवर्ण
▪️200 मीटर – 5 वा क्रमांक
▪️4×100 मीटर रिले – सुवर्ण

🥇 सारिका गावंडे

▪️400 मीटर – रौप्य
▪️200 मीटर – 4 था क्रमांक
▪️4×100 मीटर रिले – सुवर्ण

🥇 पूनम पवार

▪️लाँग जंप – सुवर्ण
▪️शॉटपुट – 4 था क्रमांक

🥇 सुमन शाहा

▪️400 मीटर – सुवर्ण
▪️200 मीटर – कांस्य
▪️4×100 मीटर रिले – सुवर्ण

🥇 रुपाली

▪️SLJ – सुवर्ण
▪️100 मीटर – कांस्य

🥇 लक्ष्मी मौजे

▪️SLJ – रौप्य
▪️100 मीटर – 4 था क्रमांक

🥇 मानसी मोरे

▪️100 मीटर – रौप्य
▪️जॅव्हलिन थ्रो – कांस्य

🥇 सिद्धीका पाटील

▪️100 मीटर – रौप्य
▪️जॅव्हलिन थ्रो – रौप्य

🥇 जयसिंग यादव

▪️800 मीटर – सुवर्ण
▪️400 मीटर – रौप्य

🥇 बाबू

▪️5000 मीटर – रौप्य
▪️3000 मीटर – 4 था क्रमांक

🥇 अखिलेश बोरकर

▪️1500 मीटर – कांस्य
▪️3000 मीटर – 5 वा क्रमांक

🥇 विजयकांत यादव

▪️3000 मीटर – 6 वा क्रमांक
▪️5000 मीटर – 4 था क्रमांक

🥇 मयुरेश कोटतीयन

▪️100 मीटर – सुवर्ण
▪️जॅव्हलिन थ्रो – कांस्य

🥇 सचिन काळे

▪️स्पॉट जंप – कांस्य
▪️100 मीटर – 6 वा क्रमांक

🥇 आयुष दुधम

▪️जॅव्हलिन थ्रो – रौप्य
▪️100 मीटर – 7 वा क्रमांक

🥇 मनीष मात्रे

▪️200 मीटर – 8 वा क्रमांक
▪️400 मीटर – सहभाग

🥇 संदेश वाघे

▪️लाँग जंप – 4 था क्रमांक
▪️200 मीटर – 8 वा क्रमांक

🥇 अर्जुन वारे

▪️लाँग जंप – रौप्य
▪️200 मीटर – 5 वा क्रमांक

या स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची लयलूट करत राज्याचा गौरव वाढवला.
ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. या दैदीप्यमान यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

20 athletes from Maharashtra win more than 50 medals in Special Olympics for the Disabled

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात