वृत्तसंस्था
श्रीनगर : Jammu encounter जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन जवान शहीद झाले आणि दोन दहशतवादी ठार झाले. याशिवाय तीन दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.Jammu encounter
सकाळपासून सुरू असलेल्या या कारवाईत डीएसपी धीरज सिंगसह पाच सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर होती. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सर्वांना जम्मू मेडिकल कॉलेज (जेएमसी) येथे रेफर करण्यात आले आहे. जुठाणा परिसरात ४-५ दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली, त्यादरम्यान गोळीबार सुरू झाला.
सोमवारी कठुआच्या हिरानगर सेक्टरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. त्यानंतर दहशतवाद्यांनी एका मुलीला आणि तिच्या पालकांना पळवून नेले होते. संधी मिळताच तिघेही दहशतवाद्यांच्या तावडीतून पळून गेले. यादरम्यान, मुलीला किरकोळ दुखापत झाली. दहशतवादीही पळून गेले होते.
१७ मार्च रोजी कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील खुरमोरा राजवार भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा झाला, तर काही दहशतवादी वेढा तोडून पळून जाण्यात यशस्वी झाले. या चकमकीत एक सैनिकही जखमी झाला.
अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर, जचलदाराच्या क्रुम्हुरा गावात घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू करण्यात आली. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर ही चकमक सुरू झाली. सकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. त्याच्या जवळ एक असॉल्ट रायफलही सापडली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App