मणिपूरमध्ये आणखी 2 मुलींवर गँगरेप, दोघांचीही हत्या; जमावासोबत आलेल्या महिलांनीच रेपसाठी दिली चिथावणी

2 more girls gang-raped in Manipur, both killed

वृत्तसंस्था

इंफाळ : मणिपूरमध्ये 4 मे रोजी जमावाने दोन महिलांना विवस्त्र करून रस्त्यावरून फिरवले होते. त्याच दिवशी आणखी दोन मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली. ही घटना कांगपोकपी जिल्ह्यातील कोनुंग मामांग भागात घडली, जे दुसऱ्या घटनास्थळापासून 40 किमी अंतरावर आहे. 2 more girls gang-raped in Manipur, both killed

पीडितेसोबत काम करणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, एक मुलगी 21 आणि दुसरी 24 वर्षांची होती. दोघीही गॅरेजमध्ये काम करायच्या. त्या दिवशी महिलाही गर्दीत आल्या होत्या. महिलांनीच गर्दीत उपस्थित पुरुषांना बलात्कार करण्यास सांगितले होते.

यानंतर ते मुलींना खोलीत घेऊन गेले. लाइट बंद केले. तोंडावर कापड बांधले होते. दीड तासानंतर त्यांना ओढत बाहेर काढण्यात आले. त्यांच्या अंगावर कपडे नव्हते. त्या रक्ताने माखलेल्या होत्या. त्याचे केसही कापले गेले.

16 मे रोजी झीरो एफआयआर नोंदवण्यात आला

त्यांनी सांगितले की, 16 मे रोजी त्यांनी सायकुल पोलिस ठाण्यात झीरो एफआयआर दाखल केला होता. घाबरल्यामुळे पूर्वी अहवाल नोंदवण्याचे धाडस केले नाही. नंतर वातावरण थोडे शांत झाल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.


Manipur Violence: महिलेला विवस्त्र फिरायला लावल्याप्रकरणी पोलिसांनी पाचव्या आरोपीस केला अटक!


पीडित मुलींचे मृतदेह अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत

एफआयआरनुसार, दोन्ही मुलींवर बलात्कार, अत्याचार आणि नंतर निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेत 100-200 लोक उपस्थित असल्याचा उल्लेख आहे. हे प्रकरण आता पोरोमपाट पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे. पोलिसांना अद्याप मृतांचे मृतदेह सापडलेले नाहीत. मणिपूर पोलिसांनी सांगितले की, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

19 जुलै रोजी व्हायरल झाला होता व्हिडिओ

4 मे रोजी थौबल जिल्ह्यात दोन महिलांची विवस्त्रावस्थेत धिंड काढण्यात आली होती. त्याचा व्हिडिओ 19 जुलै रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. काही लोकांनी दोन्ही महिलांना नग्नावस्थेत नेले आणि त्यांच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

पीडित महिलेच्या पतीने सांगितले- ‘हजारो लोकांच्या जमावाने गावात हल्ला केला होता. मी माझ्या पत्नीला आणि गावकऱ्यांना जमावापासून वाचवू शकलो नाही. पोलिसांनीही आम्हाला सुरक्षा दिली नाही. जमावाने तीन तास अत्याचार सुरूच ठेवले. माझ्या पत्नीने कसा तरी गावात आश्रय घेतला.

त्याचवेळी व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दुसऱ्या महिलेची आई म्हणाली- ‘आता आम्ही कधीच आमच्या गावात परतणार नाही. तिथे माझ्या लहान मुलाला गोळ्या घालून ठार मारण्यात आले, माझ्या मुलीची अब्रू लुटली. आता माझ्यासाठी सर्व काही संपले आहे.

2 more girls gang-raped in Manipur, both killed

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात