‘त्या’ शाळेतील आणखी २ मुलांना कोरोनाची लागण, २६ डिसेंबरपर्यंत शाळा बंद

विशेष प्रतिनिधी

घणसोली : नवी मुंबईमधील घणसोली येथील शेतकरी संस्था शाळेमधील एकूण 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. ही बातमी नुकतीच आली होती. मात्र आता याच शाळेतील आणखी 2 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. येथील सर्व विद्यार्थ्यांची कोरोना टेस्ट केली जात आहे. तर अनेक विद्यार्थ्यांचे टेस्टचे रिझल्ट यायचे बाकी आहे. तर हाती आलेल्या रिझल्ट पैकी आणखी 2 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झालेली आहे.

2 more children from school in navi mumbail are corona positive, school closed till 26th December

16 जणांना कोरोनाची लागण झाली ही बातमी येताच अनेक विद्यार्थ्यांनी शाळेला येण्याचे टाळले आहे. त्यामुळे जे विद्यार्थी शाळेला आले नाहीत त्यांची टेस्ट घरी जाऊन करणार असल्याची बातमी शाळेचे मुख्याध्यापक आर बी जाधव यांनी दिली आहे.


Corona : २०२४ पर्यंत कोरोना पिच्छा सोडणार नाही, फायझर कंपनीने केले भाकीत, लोक लस किती प्रभावीपणे घेतात, यावरच अवलंबून!


तर विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी 26 डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना बाधित विद्यार्थ्यांना सिडको प्रदर्शनी सेंटर येथे उपचार दिले जाणार आहेत. तर सर्व कोरोना बाधित विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. अशी माहिती मुख्याध्यापक जाधव यांनी या वेळी दिली आहे.

2 more children from school in navi mumbail are corona positive, school closed till 26th December

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात